भंडारा काँग्रेस कमेटीचे धरणे आंदोलन: तहसलिदार यांना निवेदन सादरभंडारा : शहर व भंडारा तालुका काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील तहसिल कार्यालयासमोर निदर्शने व धरणे देण्यात आले. तसेच मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. निवेदनात नमुद केल्याप्रमाणे अस्मानी संकटामुळे राज्याच्या बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे उत्पादनच आले नसून कापसाचे उत्पादन अत्यल्प आहे. कापसाला योग्य भाव मिळत नसून राज्य सरकारने वेळीच व पुरेसे कापूस खरेदी केंद्रही उघडले नाहीत. धानाचा शेतकऱ्यांनाही अल्प पावसामुळे चांगले उत्पादन मिळालेले नाही. ज्या भागात बऱ्याचपैकी धान उगवले होते. तिथे अतिवृष्टीमुळे पीक गमवावे लागले. राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप योग्य भाव ठरवून दिलेला नाही. अवकाळी पाऊस व वादळामुळे फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. अपुऱ्या पावसामुळे विदर्भातील जिल्हयामध्येही दुष्काळी परिस्थिती असून या दुष्काळ १९७२ पेक्षाही भयंकर आहे. या परिस्थितीत सोयाबीन व धान उत्पादकांना हेक्टरी २५ हजार रुपये तर कापसाला ६,००० रुपयांचा भाव ठरवून बाजार भावावरील रक्कम राज्य शासनाने बोनस म्हणून देण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. ओलीत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना व फळबागांना हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची मागणी आहे. राज्यात दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी व रोजगार तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध करुन देण्याची मागणी ही करण्यात आली आहे. शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात असल्यामुळे शेती कर्ज व विज बिल माफ करण्याची नितांत गरज आहे. वीज बिल माफ केल्यास शेतकऱ्यांना काही मदत होईल.अहमदनगर जिल्हयातील जवखेडा येथे दलित समाजाच्या जाधव कुटूंबातील तीन जनांची एक महिन्यापूर्वी अत्यंत क्रूर पध्दतीने निर्घुण हत्या करण्यात आली. पंरतु अजुनही आरोपींना अटक झालेली नाही. राज्याचा पोलिस विभाग आरोपींना अटक करण्यास असमर्थ असेल तर सरकारने ही चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी मागणीही काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्य सरकारकडे बहुमत नाही. विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी त्यांनी घटनेची पायमल्ली केली. भाजप पुन्हा बहुमत सिध्द करीत नाही. तोपर्यंत त्यांचे राज्यसरकार बरखास्त करुन त्यांनी घेतलेले सर्व निर्णय स्थगित करण्याची मागणी आहे.या मागण्या मान्य न झाल्यास काँग्रेस पक्षाने तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे. या आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाचे नेतृत्व भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रेमसागर गणविर, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, राजकुमार मेश्राम, अजय गडकरी, अनिक जमा पटेल, शमिम शेख, पृथ्वीराज तांडेकर, आनंद तिरपुडे, मुकुंद साखरकर, इमरान पटेल, शर्मिल बोदेले, मंगेश हुमने, पिसाराम चोपकर, चोलाराम गायधने, रामभाऊ कडव, राकेश कडबे, पराग खोब्रागडे, निखिल कुंभलकर, जय बोरकर, शमिम पठान, भावना शेंडे, भारती लिमजे, कविता चाचेरे, हिरालाल मस्के यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा
By admin | Updated: December 2, 2014 23:01 IST