शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ निर्णयाने होमगार्डवर उपासमारीचे संकट ओढावणार

By admin | Updated: August 6, 2016 00:31 IST

ज्या होमगार्डची पुनरनियुक्तीची तारीख १२ जुलै आणि येणाऱ्या होमगार्डसची पुनरनियुक्ती थांबविण्यात आली आहे,

प्रकरण फेरनोंदणीचे : सामूहिक आत्मदहनाचा दिला इशारासाकोली : ज्या होमगार्डची पुनरनियुक्तीची तारीख १२ जुलै आणि येणाऱ्या होमगार्डसची पुनरनियुक्ती थांबविण्यात आली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील पाचशेच्यावर होमगार्ड सैनिक सेवेतून कमी होणार आहेत. त्यामुळे होमगार्डवर कुटूंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाच्या निषेधार्थ १५ आॅगस्टला सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा होमगार्डस संघटनेने दिला आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.गृहरक्षक दलाचे सैनिक हे राज्य शासनाच्या आदेशानुसार कर्तव्य पार पाडत असतात. उपमहासमादेशकांनी २३ जूनच्या पत्रानुसार होमगार्डमध्ये १२ वर्षे सेवा केलेल्या सैनिकांना कमी करण्यात येणार आहे. याबाबत होमगार्ड सैनिकांनी हक्कासाठी न्याय मागणी केली असता त्या पत्राला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे ज्यांची पुनरनियुक्ती १२ जुलै रोजी संपुष्ठात आली त्यांना पुनरनियुक्ती देण्यात यावी, ज्याप्रमाणे अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासन सेवेत १० टक्के आरक्षण व वयोमर्यादेत ४६ वर्षापर्यंत सवलत देण्यात आली. त्याच धर्तीवर ३ वर्षे सेवा केलेल्या होमगार्डनासुद्धा सवलत देण्यात यावी, दर ३ वर्षानंतर होमगार्डच्या पुनरनोंदणीचे प्रयोजन रद्द करण्यात यावे, होमगार्ड नवीन नोंदणी भरती प्रक्रीया कार्यक्रम कायमचे बंद करण्यात यावे, १२ वर्षानंतर सेवा समाप्त करणारा महासमादेशकांनी निर्गमित केलेली परिपत्रके रद्द करण्यात यावी, होमगार्डसना ३६५ दिवसाचा बंदोबस्त देण्यात यावे, होमगार्डसना भत्ते व सुविधा देण्यात याव्या, पोलीस प्रशासनातील रिक्त पदे शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या आधारे भरण्यात यावे, अशा मागण्या आहेत. मान्य न झाल्यास १५ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक आत्मदहन करण्यात येईल व याची जबाबदारी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाची राहील, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी )