शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

भंडाराच्या राजाची यावर्षी मूर्ती चार फुटाची साकारण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:01 IST

भंडाराचा राजा मंडळाचे यंदा १५ वे वर्ष आहे. मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले आहे. परंतु यंदा कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने सर्व सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम रद्द केले आहेत. मूर्तीच्या उंचीबाबत शासन निर्णयाच्या अधिन राहून निर्णय घेण्याचे मंडळाने या आधीच जाहीर केले होते.

ठळक मुद्देकोरोना संसर्गामुळे साध्या पद्धतीने उत्सव। पारंपारिक पद्धतीने होणार प्राणप्रतिष्ठा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दरवर्षी भंडाराच्या राजाचे लोभस रुप पाहण्यासाठी भक्तांचे डोळे आसूसलेले असतात. विविध सामाजिक उपक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमामुळे भंडाराचा राजा शहरातच नव्हे तर जिल्ह्यात नावारुपास आला आहे. मात्र यावर्षी कोरोना संसर्गामुळे गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून भंडाराच्या राजाची मूर्ती यंदा चार फुटाचीच साकारणार आहे. मंडळाच्या देव्हाऱ्यातील पारंपारिक पद्धतीने गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.भंडाराचा राजा मंडळाचे यंदा १५ वे वर्ष आहे. मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले आहे. परंतु यंदा कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने सर्व सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम रद्द केले आहेत. मूर्तीच्या उंचीबाबत शासन निर्णयाच्या अधिन राहून निर्णय घेण्याचे मंडळाने या आधीच जाहीर केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत धार्मिक बाब, चिंतामणी भक्त, शासन यंत्रणा, पोलीस यंत्रणा व जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीचा विचार करून मंडळाच्या आदर्शवादी भूमीकेची जाण ठेवून यंदा गणरायाची चार फुटाचीच मूर्ती साकारली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन केले जाणार असून कोरोना जनजागृतीबाबतही मंडळाने पुढाकार घेतला आहे. गणेशोत्सवाच्या परंपरेला खंडीत न होऊ देता मंडळाने हा निर्णय घेतला आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा यानुसार मंडळ यावर्षी उत्सव साधेपणाने साजरा करीत असून जनतेकडून सहकार्याची अपेक्षा मंडळाचे अध्यक्ष मंगेश वंजारी यांनी केली आहे.भंडाराचा राजाचा दरवर्षी थाट काही ओरच असतो. येथील गांधी चौक परिसरातील गुजरीत विशाल मंडपात बाप्पा विराजमान होतात. भाविकांची येथे गणेशोत्सवाच्या काळात रिघ लागलेली असते. सामाजिक आणि धार्मीक उपक्रम राबविण्यात अव्वल ठरलेला भंडाराचा राजा यंदा मात्र भंडारेकरांना लघुरुपात दर्शन देणार असल्याचे मंगेश वंजारी यांनी सांगितले.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव