शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

५३,१११ शेतकऱ्यांना मिळाला कर्जमाफीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:22 IST

आॅनलाईन लोकमतभंडारा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफी अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील ५३ हजार १११ शेतकऱ्यांचा ग्रीन यादीत समावेश करण्यात आला असून २० हजार ५०० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यात २० हजार ५०० शतेकरी कर्जमाफी अंतर्गत दोन हजार १९६ शेतकºयांना ‘वन टाईम सेटलमेंट’ लाभ मिळणार आहे. ३० हजार ...

ठळक मुद्देशिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना : ३०,४१५ शेतकºयांना प्रोत्साहनपर अनुदान मंजूर

आॅनलाईन लोकमतभंडारा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफी अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील ५३ हजार १११ शेतकऱ्यांचा ग्रीन यादीत समावेश करण्यात आला असून २० हजार ५०० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यात २० हजार ५०० शतेकरी कर्जमाफी अंतर्गत दोन हजार १९६ शेतकºयांना ‘वन टाईम सेटलमेंट’ लाभ मिळणार आहे. ३० हजार ४१५ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात ४१ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाने १९ हजार कोटी रूपयांची रक्कम बँकांकडे वर्ग केली. या योजनेंतर्गत राज्यभरात ७७ लाख अर्ज प्राप्त झाले होते. ंअर्जाच्या छानणीअंती कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. जे शेतकरी पात्र होते परंतु अर्ज केले नाही अशा शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेण्यात येणार आहे.या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबाचे दीड लाख रूपयांपर्यतचे कर्ज माफ करणे, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार रूपयांपर्यत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांना योजनेत सामावून घेण्यात आले. जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांवर कर्जमाफीची रक्कम वितरणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्ज माफ झाल्यामुळे कर्जाचा भार हलका झाला. कर्जमाफीमुळे दिलासा मिळाल्याचे सांगत पिसाराम चोपकर, रा.सिल्ली, राजू नरडंगे रा.डोडमाझरी, रवी पुडके रा.पांढराबोडी, मंगल भोतमांगे रा.आमगाव यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे.