शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या धडकेत युवकाचा मृत्यू

By admin | Updated: May 28, 2015 00:34 IST

अपघातानंतर मृतदेह रुग्णवाहिकेत न नेता चक्क बसमध्येच टाकून साकोलीला आणण्याचा प्रयत्न केला.

नागरिकांनी केली वाहतूक ठप्प : अपघात महालगावात, आंदोलन कुंभलीतसाकोली : अपघातानंतर मृतदेह रुग्णवाहिकेत न नेता चक्क बसमध्येच टाकून साकोलीला आणण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या मृतकाच्या नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी बस कुंभली येथे अडवून बसचालक व पोलिसांना निलंबित करण्यात यावी अशी मागणी केली. या दरम्यान साकोली-लाखांदूर मार्गावर दोन तास वाहतूक ठप्प राहिली. अखेर लेखी आश्वासनानंतर मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. राजेंद्र भास्कर चुटे (२१) रा. वांगी असे मृत युवकाचे नाव आहे.राजेंद्र हा आज दुपारी १ वाजताच्या सुमारास दुचाकीने वांगी येथून साकोली येथे असताना महालगाव जवळ साकोलीहून खोबा येथे प्रवासी घेऊन जाणाऱ्या बस एम एच ०६ एस ८८२३ ने राजेंद्रच्या दुचाकीला धडक दिली. यात राजेंद्र जागीच ठार झाला. माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस पोहोचले. मात्र पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करता व मृतकाच्या नातेवाईकांना न सांगताच मृतदेह बसमध्ये टाकून साकोली येथे आणीत होते. या घटनेची माहिती मिळताच मृतकाचे कुटुंबीय व गावकरी यांनी तात्काळ बसचा पाठलाग करीत बस कुंभली येथे अडविले. यावेळी राजेंद्रचे प्रेत बसमध्ये समोरच्या सिटच्या खाली ठेवले होते. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत बसचालक व पोलिसांना निलंबित केल्याशिवाय उत्तरीय तपासणी करु देणार नाही, असा पवित्रा घेतला. या दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी हिंमत जाधव हे घटनास्थळावर पोलीस कुमक घेऊन पोहोचले. मात्र परिस्थिती चिघळत गेली. शेवटी बस आगार व्यवस्थापक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्यावर मृतदेह रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)अपघात प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन दोषी पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करु.- हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी