शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू

By admin | Updated: May 7, 2016 01:02 IST

तीन दिवसांपासून घरून बेपत्ता असलेल्या एका इसमाचा मृतदेह गोसेखुर्द धरणाजवळ आढळून आला.

गोसेखुर्द धरणाजवळची घटना : चार दिवसांपासून घरून होता बेपत्ता पवनी : तीन दिवसांपासून घरून बेपत्ता असलेल्या एका इसमाचा मृतदेह गोसेखुर्द धरणाजवळ आढळून आला. घटनास्थळावर वाघाच्या पायाचे ठसे आढळून आल्यामुळे त्याचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुनर्वसित मेंढा येथील रहिवाशी प्रेमलाल आगरे (६०) असे मृतकाचे नाव आहे. ते गोसीखुर्द धरणा लगतच्या वैनगंगा नदीत मासेमारी करीत होते. २ मे रोजी ते मासेमारीसाठी घरून गेले. परंतु तीन दिवसांपासून ते घरी पोहोचले नव्हते. त्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू होती. धरणाला लागून असलेल्या उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या पवनी वनपरिक्षेत्राच्या कंपार्टमेंट क्रमांक ३०० मध्ये छिन्नविछिन्न स्थितीत मृतदेह आढळून आला. घटनास्थळावर त्याची सायकल आणि कपड्याचे तुकडे आढळून आले. मृतदेहाच्या बाजुला वाघाचे ठसे आढळून आले. त्यावरून वाघाच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. या घटनेला वनविभागाने दुजोरा दिला आहे. घटनेची माहिती मिळताच पवनी पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळावर पोहोचून पंचनामा करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)