शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बुडणाऱ्या पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीसह भाच्याचा मृत्यू; भंडारा जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 12:45 IST

तलावात बुडत असलेल्या पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीसह भाच्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साकोली येथील नवतलावात मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देपत्नी मात्र बचावली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तलावात बुडत असलेल्या पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीसह भाच्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साकोली येथील नवतलावात मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. आसिफ दिलावर शेख (३५) व शोएब बुटो दुधकनोज (१५) दोन्ही रा.सिव्हील वॉर्ड साकोली असे मृत पावलेल्या मामा - भाच्याची नावे आहेत.आसिफ हा कुटुंबासह सिव्हील वॉर्डात राहतो. तो कधी आईसक्रीम तर कधी मक्याची लाही विकून कुटुंबाचा गाडा चालवित असे. सध्या लॉकडाऊनमुळे त्याचा रोजगार बंद होता. त्यातूनच घरी उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. हाताला जे काम मिळेल ते करून आसिफ जीवनयापन करीत होता. आज सकाळी आसिफ व त्याच्या पत्नी घरगुती काणामुळे भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की, त्याची पत्नी घराशेजारी असलेल्या नवतलावकडे पळत सुटली. तिच्या पाठोपाठ आसिफ व घरातील मंडळी धावली. पाहता पाहता आसिफच्या पत्नीने तलावात उडी घेतली. तिला वाचविण्यासाठी आसिफ, त्याचा भाचा शोएब व आसिफचा भाऊ या तिघांनी तलावात उडी घेतली. तिघांनीही आसिफच्या पत्नीला वाचविले. मात्र आसिफ व त्याचा भाचा हे दोघेही खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. खोल भागात जाऊन फसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मामा भाच्याचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. साकोली पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यू