शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने चार रानगव्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 23:09 IST

सध्या उन्हाचा तडाखा माणसासह जनावरांनाही सोसणे कठीण झाले आहे. यातच जंगलात पाण्याची अपुरी व्यवस्था व आटलेले तलाव यामुळे वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहे.

ठळक मुद्देबांपेवाडा येथील घटना : पाण्यासाठी वन्यप्राण्यांची गावांकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सध्या उन्हाचा तडाखा माणसासह जनावरांनाही सोसणे कठीण झाले आहे. यातच जंगलात पाण्याची अपुरी व्यवस्था व आटलेले तलाव यामुळे वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहे. पाण्याच्या शोधात चार रानगवे शेताकडे गेली व तिथेच त्यांना आपला प्राण गमवावा लागला. ही घटना बांपेवाडा शेतशिवारात तीन दिवसांपूर्वी घडली. चार रानगव्यांचा विद्युत प्रवाहाच्या धक्याने मृत्यू झाला.बांपेवाडा शिवारालगत नागझिरा अभयारण्य लागून आहे. या जंगल परिसरात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र यावर्षी पावसाळ्यात पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे जंगलातील तलाव कोरडेच राहिले.परिणामी पाण्याची भीषण समस्या जंगलातही जाणवत आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधासाठी वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहेत. पांडुरंग चांदेवार रा.बांपेवाडा यांच्या शेतात उन्हाळी धान पिक आहे. मात्र सदर शेतशिवाराला लागूनच जंगलाचा परिसर आहे. त्यामुळे जंगली जानवर शेतात येऊन धानाची नासधूस करतात. म्हणून चांदेवार यांनी शेतात विद्युत करंट लावून ठेवले होते. मात्र रात्री अंधारात पाण्याच्या शोधात आलेल्या चार रानगव्यांना शेतातच विद्युत प्रवाहाचा झटका लागला. त्यामुळे घटनास्थळीच चारही रानगव्यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्राधिकारी कोळी, सहाय्यक वनक्षेत्राधिकारी खोटेले, वनरक्षक गिºहेपुंजे ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले.त्यांनी चारही रानगव्यांचा पंचनामा करून यात दोन मादी रानगव्यांचा समावेश असून त्यांचे वय अंदाजे साडेतीन ते चार वर्षे आहे. तर दोन रानगव्यांची पिल्ले आहेत. त्यांचे वय अंदाजे ६ महिने ते १ वर्षे असे आहे.पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.वाघाडे यांनी घटनास्थळावरच चारही रानगव्यांचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर या चारही रानगव्यांना जमिनीत पुरण्यात आले. या प्रकरणी वनविभागाने दोघांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे.