शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या भीषण धडकेत दोघांचा मृत्यू

By admin | Updated: March 9, 2015 01:18 IST

शेतातील काम आटोपून गावाकडे जाणाऱ्या मोपेडस्वार युवकांना वाहनाने जबर धडक दिली. या भीषण अ

गावात शोककळा : चप्राड पहाडीजवळील घटना, अपघातांत वाढ, अपघात प्रवणस्थळ म्हणून फलक लावण्याची गरजलाखांदूर : शेतातील काम आटोपून गावाकडे जाणाऱ्या मोपेडस्वार युवकांना वाहनाने जबर धडक दिली. या भीषण अपघातात मोपेडवरील दोघांचा घटनास्थळीच दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना लाखांदूर-वडसा मार्गावरील चप्राड टेकडीजवळील वळणार आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.मुलचंद श्रावण ढोरे (२३) रा. आवळी व घनश्याम निवृत्ती मिसार (३०) रा. सोनी, असे मृतकांचे नाव आहे. सोनी येथील घनश्याम मिसार हे दुचाकी एमएच ३३ एन ४२३६ ने आसोला येथील शेतावर खताची बॅग पोहचविण्यासाठी गेला होता. शेतातील काम आटोपून घनश्याम गावाकडे परतत असताना आसोला बस थांब्यावर उभ्या मुलचंदने त्याला 'लिप्ट' मागितली. दोघेही ओळखीचे असल्याने दुचाकीने सोनी गावाकडे निघाले. दरम्यान चप्राड पहाडीजवळ वडसाकडून येणाऱ्या भरधाव वाहन एमएच ३३ जी १९४३ ने दुचाकीला आमोरासमोर जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेली व दुचाकीचा चुराडा झाला. या अपघातात दुचाकीवरील मुलचंद व घनश्याम या दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. तर वाहनचालक किरकोळ जखमी झाला. गअपघाताची माहिती मिळताच, पंचायत समिती उपसभापती नुतन कांबळे यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी तातडीने मदतकार्य केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. मृतक घनश्याम हा लाखांदूर येथील साखर कारखाना येथे रोजंदारी कामावर असून तो साकोली येथील कार्यालय सांभाळत होता. या अपघातस्थळी आतापर्यंत डझनभर अपघात घडले आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने या स्थळावर अपघात प्रवणस्थळ म्हणून फलक लावण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)मुलचंदचा ‘लिफ्ट’ने घेतला जीव४आवळी येथील मुलचंद हा बहिणीला पोहोचविण्यासाठी तिच्या सासरी आसोला येथे गेला होता. रात्र झाल्याने बहिणीकडे मुक्काम केला. सकाळी उठल्यावर बहिणीच्या हातचा चहा घेतला. यानंतर त्याने बहिणीला ‘येतो ग् ताई’ असे म्हणत घर सोडले. आसोला बस थांब्यावर बसची वाट बघत असताना घनश्याम एकटाच मोपेडने जात असल्याने त्याला ‘लिफ्ट’ मागितली. हीच त्याच्यासाठी दुर्दैवी बाब ठरली. पोलिसांनी जपली माणुसकी४अपघात घडल्यानंतर नागरिकांची एकच गर्दी उसळली. मात्र, मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी कुणीच सरसावले नाही. यावेळी पोलीस निरीक्षक प्रशांत कुलकर्णी व सहायक पोलीस निरीक्षक निंबेकर यांनी पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून रूग्णवाहिकेत ठेवून उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. यावेळी नागरिकांनी मदतीचा हात न दिल्याने, माणुसकी हरपली तर नाही असे वाटत होते. मात्र पोलिसांच्या मदतीने माणुसकी जिवंत असल्याची प्रचिती आली.घनश्यामसाठी ठरली काळी पहाट४घनश्याम हा आईवडीलांच्या म्हातारपणाचा एकुलता आधार होता. त्याला अवघ्या वर्षभराची मुलगी आहे. घरातील कर्ता असल्याने तो आसोला येथील शेतीवर नित्याप्रमाणे पहाटेच खताची बॅग घेऊन गेला होता. काम आटोपून मोपेडने तो निघला. दरम्यान आसोलाच्या बस थांब्यावर उभा असलेल्या मुलचंदने त्याला लिप्ट मागितली. दोघेही निघाले असता वाटेत त्यांच्यावर भरधाव वाहनरूपी काळाने झडप घातली.