शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जंक फुड शरीराला घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 06:00 IST

मुलांना कोणते पदार्थ खायला द्यावेत किंवा नाहीत याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जंक फुड खाणे म्हणजे शरीराचा घात करण्यासारखे आहे. पिज्जा, बरगत, चायनिज अन्न पदार्थांचे सेवन दिवसेंगणिक घातक होत आहे. त्यांचे सेवन करून नये. जंक फुड शरीराला घातक आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त एन.डी. मोहिते यांनी दिली.

ठळक मुद्देएन.डी. मोहिते । जे.एम. पटेल महाविद्यालयात सकस पोषण आहारावर कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मुलांना कोणते पदार्थ खायला द्यावेत किंवा नाहीत याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जंक फुड खाणे म्हणजे शरीराचा घात करण्यासारखे आहे. पिज्जा, बरगत, चायनिज अन्न पदार्थांचे सेवन दिवसेंगणिक घातक होत आहे. त्यांचे सेवन करून नये. जंक फुड शरीराला घातक आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त एन.डी. मोहिते यांनी दिली.येथील जे.एम. पटेल महाविद्यालयात मुलांना परिपूर्ण व पोषक आहार देण्याअंतर्गत माहितीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मोहिते बोलत होते. पटेल महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमीकक्ष व विज्ञान फोरम व प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या सहकार्याने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर अन्न व औषध प्रशासनाने वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी भाष्कर जी. नंदनवार, एस.एस. देशपांडे, पी.व्ही. मानवतकर, प्रा. डॉ. कार्तिक पनीकर, विज्ञान फोरमचे एस.डी. बोरकर आदी उपस्थित होते.यावेळी मोहिते यांनी सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षीत व योग्य अन्न सेवनाबाबत मार्गदर्शन केले. एस.एस. देशपांडे यांनी हायफॅट सोडियम व शुगर असलेल्या अन्न पदार्थाच्या सेवनाच्या दुश्परिणामाबाबत माहिती दिली.विद्यार्थ्यांनी कडधान्य, चपाती, लिंबू, शरबत, फळे, नारळ पाणी याचे नियमित सेवन करावे, असा सल्लासुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात आला. अन्न सुरक्षा, अन्न सुरक्षीतता तसेच महाविद्यालय हायजीन रेटिंगचे पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती देण्यात आली. सदर कार्यशाळेला उपस्थित पाहुण्यांचे आभार जी.बी. तिवारी यांनी मानले.कार्यशाळेसाठी श्याम डफरे, डॉ. अनंत मुळे, डॉ. सुनील झंजे, प्रा. यशपाल राठोड यांच्यासह अन्न व औषध प्रशासन विभागातील कर्मचारी आयक्युएसीचे समन्वयक डॉ. पनीकर यांच्यासह विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Junk Foodजंक फूड