शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीत तोडले टाके; पोटातच दाखविले मृत बाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 12:50 IST

काही काळ तणावाची स्थिती : उपचारादरम्यान गर्भार मातेचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क पालांदूर : प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात पोटातील बाळही दगावले. शवविच्छेदन करून पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र, अंत्यविधीच्या वेळी बाळ आईच्या सोबत न दिसल्याने जनाक्रोश झाला. ही घटना लाखनी तालुक्याच्या लोहारा येथे रविवारी उघडकीस आली. अस्मिता महेश मेश्राम (२९), रा. लोहारा, असे मृत महिलेचे नाव आहे. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय चमूने स्मशानभूमीत दाखल होऊन महिलेवर झालेल्या शस्त्रक्रियेचे टाके तोडत बाळ दाखविले. तब्बल सात तासांनंतर अंत्यविधी पार पाडण्यात आला. या घटनेने मात्र काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

माहितीनुसार, १४ सप्टेंबर म्हणजेच शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास लोहारा येथील अस्मिता मेश्राम या गरोदर महिलेला प्रसूतीसाठी खराशी येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 'रेफर' करण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयातील लेबर रूममध्ये दाखल झाल्यानंतर उपचारादरम्यान अस्मिताचा मृत्यू झाला. 

गर्भवती महिलेचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी महिलेच्या मृतदेहासोबत उजव्या बाजूला बाळ ठेवल्याचे सांगण्यात आले होते, असे नातेवाइकांचे म्हणणे होते. रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास लोहारा स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी पार्थिव नेले असता बाळावर अंत्यसंस्कार करण्याकरिता पाहिले असता बाळ तिथे आढळले नाही. एकच गोंधळ उडाला. यावेळी शंका-कुशंकांचे पेव फुटले. संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पालांदूर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला.

यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाकडून मृत बाळ मातेच्या पोटात असल्याचे सांगण्यात आले; परंतु कुटुंबीय तसेच ग्रामस्थांनी आमच्या समक्ष पोटात बाळ आहे काय? हे दाखवण्यात यावे, अशी मागणी केली. यावेळी जिल्हा रुग्णालयातील चमूने घटनास्थळी येत मृत गरोदर महिलेचे टाके काढत पोटातील बाळ दाखवले. बाळ आढळून आल्यानंतर तणाव निवळला. त्यानंतर मृत महिलेवर बाळासह अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, तोपर्यंत सात तासांचा कालावधी लोटला होता. मृत महिलेच्या मागे पती, मुलगा असा परिवार आहे. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक दीपचंद सोयाम यांच्याशी भ्रमणधणीवर संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

अन् तणाव निवळला... प्रसूती झाल्यानंतर बाळ आईच्या उजव्या बाजूला ठेवले आहे, असे सांगण्यात आले होते. मात्र, अंत्यविधीच्या वेळी बाळ न आढळून आले नाही. परिणामी बाळ आम्हाला दाखविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यात जिल्हा सामान्य रुग्णालयाची चमू दाखल होत महिलेचे टाके तोडत पोटातील मृत बाळ दाखविण्यात आले. यानंतर तणाव मावळला.

"वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्मशानभूमीत दाखल झालो. सायंकाळी ४ वाजता जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिथेच टाके तोडीत पोटातील मृत बाळ नातेवाइकांना दाखविले. बाळ दिसताच वातावरण शांत झाले." -डॉ. प्रशांत फुलझले, ग्रामीण रुग्णालय, पालांदूर

"लोहारा येथील स्मशानभूमीत तणावपूर्ण स्थिती असल्याची माहिती मिळाली. लगेच कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावला. वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. पालांदूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला आहे." - विवेक सोनवणे, पोलिस निरीक्षक, पालांदूर 

टॅग्स :bhandara-acभंडारा