शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
3
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
4
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
5
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
6
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
7
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
8
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
9
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
10
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
11
CSK स्टार मुरली विजयी दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
12
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
13
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
14
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
15
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
16
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
17
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
18
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
19
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
20
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!

रेती तस्करीने तई-भंडारा डांबरी मार्गाची दैनावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST

सदर मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले असून या मार्गाची अजूनही डागडुजी करण्यात आली नाही. या मार्गावरून मार्गक्रमण करणे जिकरीचे झाले असून जीव धोक्यात घालून प्रवासी प्रवास करीत असतात. या रस्त्यावरून शेकडो विद्यार्थी ये-जा करीत असतात. या मार्गावरील तई गावाजवळ असलेल्या पुलाला भेगा पडल्या आहेत. त्यातील लोखंडी सळाखी बाहेर दिसत आहेत.

ठळक मुद्देसंडे अँकर । रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्पर वाढले, महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कबारव्हा : लाखांदूर तालुक्यातील बारव्हा ते तई - बेलाटी या डांबरी रस्त्याची दैनावस्था झाली आहे. या मार्गावरून आवागमण करण्याºया वाहन चालकांना तथा पादचाऱ्यांना खड्डे चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी रोजच या रस्त्यावर लहान मोठे अपघात होत असून अनेकांच्या वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.सदर मार्ग हा बेलाटी, कोंढा, पवनी, आसगाव, भंडारा, नागपूर, उमरेड या ठिकाणी जाण्यासाठी सोयीस्कर असल्याने याच मार्गाने वाहनचालक मोठ्या संख्येने आवागमन होत असते. या मार्गावरून रात्री बेरात्री कधीही वाहतूक सुरु असते. या मार्गावरून रेतीची माफियांचा धुमाकुळ सुरु असून दररोज शेकडो टिप्पर रेतीची तस्करी होत आहे. यात संबंधित विभागाचे चांगभले होत असल्याने कोणत्या अधिकाºयाकडे दाद मागावी आणि न्याय मिळावा अशी मागणी परिसरातील नागरिकांना येत नाही. यावर लोकप्रतिनिधींनी सुद्धा चुप्पी साधली आहे.सदर मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले असून या मार्गाची अजूनही डागडुजी करण्यात आली नाही. या मार्गावरून मार्गक्रमण करणे जिकरीचे झाले असून जीव धोक्यात घालून प्रवासी प्रवास करीत असतात. या रस्त्यावरून शेकडो विद्यार्थी ये-जा करीत असतात. या मार्गावरील तई गावाजवळ असलेल्या पुलाला भेगा पडल्या आहेत. त्यातील लोखंडी सळाखी बाहेर दिसत आहेत. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे आणि ओव्हरलोड वाहतूक बंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.रस्ता बांधकामात अनियमितता !रस्ता बांधकाम करताना निकृष्ठ साहित्यांचा वापर होत असल्याने रस्त्यावर खड्डे पडत असल्याचा अंदाज रेती चोरटे करित आहेत. मात्र क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक होत असल्याने रस्ते नादुरुस्त होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. एकीकडे खड्डे मुक्तची घोषणा तर दुसरीकडे खड्डेच खड्डे, यामुळे प्रश्न निर्माण होत आहे.खड्डे जीवघेणेगत महिन्याभरापासून रेतीची ओव्हरलोड वाहतूक सुरु आहे. या ओव्हरलोड रेतीच्या वाहतुकीमुळे अनेक डांबरी रस्ते पूर्णत: फुटले असून या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष आहे. सध्या महसूल विभागातील कर्मचारी विधानसभा निवडणुकीत व्यस्त आहेत.