राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील नवरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतीले वर्ग सातवीचा विद्यार्थी दर्शन सचिन लाडसे याने स्वत:च्या कल्पकबुद्धीने विना पेट्रोलने चालणारी हायड्रोलिक कार तयार केली आहे. हायड्रोलिक कारचा आविष्कार गावकऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे.दर्शनचा जन्म होताच वडील सचिन यांनी पत्नी आणि मुलाला सोडून बाहेर निघून गेले. ते अजूनपर्यंत परत आले नाही. दरम्यान दर्शन व त्याची आई निर्मला नवरगांव येथे आपल्या आजीकडे वास्तव्यास आहेत. दर्शनची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून आई निर्मला मजुरीचे कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. दर्शनने अभ्यास करून खूप मोठा अधिकारी व्हावे असे त्याच्या आईचे स्वप्न आहे. मात्र दर्शनला अभ्यासाच्या व्यतिरिक्त विज्ञान विषयामध्ये अधिक आवड आहे. त्याला नवनवीन प्रयोग करून पाहणे ही त्याची जमेची बाजू आहे. मात्र त्यासाठी लागणाºया साहित्यांसाठी पैसा जुळविण्यासाठी बालपणात खाऊ खाण्यात पैसे खर्च न करता ते पैसे गोळा करून साहित्य खरेदी करायचा व नवनवीन प्रयोग तयार करत होता. दरम्यानच्या काळात दर्शनने अँड्रॉइड मोबाईलमधील यु-ट्यूब, व्हिडिओ, टीव्हीतून माहिती गोळा करून थेट हायड्रोलीक कारच तयार केली व ती हायड्रोलिक कार शाळेत घेऊन आला. त्यावेळी तेथील उपस्थित शिक्षकांनी दर्शनच्या कार्याचे कौतुक करून त्याचा प्रयोग अधिक चांगले व दर्शनी होण्यासाठी मुख्याध्यापक राजन सव्वालाखे, नीता पटले, मंजुषा चाचेरकर, प्रियंका रामटेके यांनी दर्शनला आर्थिक मदत व मार्गदर्शन केले. दर्शनने तयार केलेल्या कारविषयी म्हणाला, सदर कारमुळे अपघात होणार नाही, स्वऊर्जा निर्मित होऊन पेट्रोलविना कार चालेल. दर्शन प्रत्यक्ष कारच्या बाबतीत जी माहिती सांगतो ते तर ऐकून भविष्यात त्याच्यामध्ये सृजनशीलता, कल्पक बुद्धी असून तो निश्चितच नावलौकिक करेल यात काही शंका नाही. परंतु त्याला प्रगतीसाठी प्रेरणेची व आर्थिक पाठबळाची गरज आहे.ग्रामीण प्रतिभेला हवे पाठबळग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रतिभा आहे. मात्र त्याची योग्य वेळी दखलच घेतली जात नाही. त्यामुळे अनेक प्रतिभावंत समाजाच्या पुढे येत नाही. नवरगाव येथील विद्यार्थ्याने आपल्या प्रतिभेचा आणि कौशल्याचा वापर करुन कार तयार केली. त्याच्या प्रतिभेला पाठबळ मिळाले तर हा ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे मोठा वैज्ञानिक होणार यात शंका नाही.
दर्शनने तयार केली पेट्रोलविना चालणारी हायड्रोलिक कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 06:00 IST
दर्शनचा जन्म होताच वडील सचिन यांनी पत्नी आणि मुलाला सोडून बाहेर निघून गेले. ते अजूनपर्यंत परत आले नाही. दरम्यान दर्शन व त्याची आई निर्मला नवरगांव येथे आपल्या आजीकडे वास्तव्यास आहेत. दर्शनची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून आई निर्मला मजुरीचे कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. दर्शनने अभ्यास करून खूप मोठा अधिकारी व्हावे असे त्याच्या आईचे स्वप्न आहे.
दर्शनने तयार केली पेट्रोलविना चालणारी हायड्रोलिक कार
ठळक मुद्देखाऊच्या पैशाचा केला उपयोग : शिक्षकांनी केले प्रोत्साहित, नवरगावासींयामध्ये कुतूहल