शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

ऊसाची धोकादायक वाहतूक

By admin | Updated: December 29, 2016 02:10 IST

सध्या ऊसाची वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यात एकाच ट्रॅक्टरला दोन ट्रॉली मधून ऊसाची वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष : ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेक्टर लावण्याची मागणी अड्याळ : सध्या ऊसाची वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यात एकाच ट्रॅक्टरला दोन ट्रॉली मधून ऊसाची वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतु त्यामुळे अपघातालाही निमंत्रण दिल्यासारखे वाटत आहे. ट्रॉलीच्या मागे रिफलेक्टर नाही, लाईट नाही त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्रीचा प्रवास करणारे वाहनचालक ऊस ट्रॅक्टरमुळे धास्तावलेले आहेत व वाहतूक करणाऱ्या प्रत्येक ट्रॉलीला रिफलेक्टर त्वरीत लावावे, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहेत. ही वाहतूक अड्याळ पोलीस स्टेशन समोरून रोजच रात्री दिवसा होत असतानाही येथील ठाणेदार याकडे लक्ष देत नाही. जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह येतो तेव्हा अपघात रोखण्यासाठी सप्ताहानिमित्ताने जनजागृतीपर कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन केल्या जाते, अशी चर्चा वाहनचालकात ऐकण्याला मिळते. जेव्हा गरज आहे त्याही वेळी जर रस्ता सुरक्षा सप्ताह पाळले तर आज ही चर्चा झाली असती का? हाही एक प्रश्नच आहे. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह जानेवारी महिन्यात होतो तर ऊसाचा हंगाम नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये सुरू होतो. अनेक ऊस ट्रॅक्टर चालक फक्त एकाच हेड लाईटचा वापर करताना दिसतात त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनधारकांची फसगत होते. समोरून मोटार सायकल येत आहे या अंदाजाने वाहन चालवत असतात पण ट्रॅक्टर जवळ आल्यावर वाहनचालकाच्या लक्षात येते. त्यामुळे समोरून येणारी वाहने ट्रॅक्टरवर आदळण्याची दाट शक्यता असते तर दुसरीकडे सिंगल व डबल ट्रॅक्टरच्या मागे ब्रेक लाईट नसतो फक्त रिफलेक्टरच्या अंदाजाने वाहन चालवावे लागते. अनेक ट्रॅक्टर ट्रॉलींना जुनेच रिफलेक्टर असल्याने ते खराब झाले आहेत. परंतु या सर्व गोष्टी ट्रॅक्टर चालकाकडून पूर्ण करवून घेणार कोण, आरटीओ विभाग ही याकडे दुर्लक्ष करत तर नसावा? रस्ता सुरक्षा सप्ताहात एकूण एक माहिती पोलीस विभागाकडून सांगितली जाते. यातही शंका नाही. दरवर्षी अपघात रोखण्यासाठी या सप्ताहानिमित्ताने जनजागृतीसाठी मोठ मोठे कार्यक्रमसुद्धा घेण्यात येतात. सप्ताह येण्याआधीच जर या ट्रॅक्टरांना रिफलेक्टर लावले तर अपघात होण्यापासून वाचू शकतो. अन्यथा एखाद्याला जीव गमवावा लागण्याची सध्याच्या वाहतुकीवरून बघायला मिळत आहे. या ट्रॅक्टरचे दोन्ही हेड लाईट, रिफलेक्टर त्वरीत लावण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिक तथा वाहनचालकांनी केली आहे. (वार्ताहर)