शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने ८,३३२.२० हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 12:27 IST

Bhandara : नुकसानीअंतर्गत तालुक्यातील सुमारे ८१९ शेतकरी भरपाईसाठी पात्र

लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : गत २० ते २२ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सुमारे ८ हजार ३३२.२० हेक्टर क्षेत्रातील आवत्या व रोवणी झालेल्या धानपिकाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ही माहिती स्थानिक लाखांदूर तालुका प्रशासनांतर्गत देण्यात आली आहे.

खरीप हंगामात दरवर्षी लाखांदूर तालुक्यातील जवळपास २८ हजार हेक्टर क्षेत्रात विविध खरीप पिकांची लागवड केली जाते. त्यामध्ये सर्वाधिक २५ हजार हेक्टर क्षेत्रात केवळ धान पिकाची लागवड केली जाते. उर्वरित क्षेत्रांत विविध खरीप पिकांची लागवड केली जाते. या लागवडीअंतर्गत यंदाच्या खरिपात गत काही महिन्यांत तालुक्यातील ५२३ हेक्टर क्षेत्रात आवत्या धानपिकाची लागवड करण्यात आली होती. उर्वरित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धान पिकाची रोवणी करण्यात आली होती.

धान पिकाची लागवड होऊन काही दिवस लोटत नाही तोच मागील २० जुलै ते २२ जुलैदरम्यान तालुक्यात सरासरी २४१.५ मिमी पाऊस पडला होता. हा पाऊस सरासरी अतिवृष्टीच्या तब्बल चौपट अधिक झाल्याने यंदाच्या खरिपात लागवडीखालील सर्व शेतपिके पाण्याखाली बुडाली होती.

पाण्याखाली बुडालेली पिके नष्ट झाल्याने नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती. तालुका प्रशासनाने स्थानिक तलाठी कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्या संयुक्त नेतृत्वात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतपिकांचे पंचनामे करण्यात आले होते. या पंचनाम्यानुसार स्थानिक लाखांदूर तालुक्यातील सुमारे ८ हजार ३३२.२० हेक्टर क्षेत्रातील धानपिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

१७ हजार १०८ शेतकऱ्यांना मिळणार भरपाईअतिवृष्टीमुळे ८ हजार ३३२.२० हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीअंतर्गत तालुक्यात खरिपात कोरडवाहू क्षेत्रात लागवडीखालील आवत्या धानपिकाचे एकूण ५२३ हेक्टर क्षेत्रापैकी ३५२.४२ हेक्टर क्षेत्रातील धान पिकाचे नुकसान झाले. या नुकसानीअंतर्गत तालुक्यातील सुमारे ८१९ शेतकरी भरपाईसाठी पात्र ठरल्याची माहिती देण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना शासननियमांनुसार प्रतिहेक्टर १३ हजार ६०० रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई अपेक्षित आहे तर तालुक्यातील सिंचनयुक्त क्षेत्रांतर्गत सुमारे ७ हजार ९७९.७८ हेक्टर क्षेत्रातील रोवणी झालेल्या धानपिकाची नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार तालुक्यातील सिंचन सुविधाधारक सुमारे १६ हजार २८९ शेतकऱ्यांना शासननियमानुसार प्रतिहेक्टर २७ हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई अपेक्षित आहे. एकंदरीत अतिवृष्टीमुळे लाखांदूर तालुक्यातील आवत्या व रोवणी अंतर्गत नुकसानग्रस्त सुमारे १७ हजार १०८ शेतकरी नुकसानभरपाईसाठी पात्र ठरले आहेत. 

 

टॅग्स :farmingशेतीbhandara-acभंडारा