शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसामुळे रोवणीच्या कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:51 IST

वरूण राज्याच्या आशिर्वादाने सर्वत्र पर्जन्यवृष्टी होत आहे. शेतात रोवणीचे कामे जोमात सुरू आहेत.

ठळक मुद्देमजुरांना रोजगार : साकोली तालुक्यात खरीप हंगाम

शिवशंकर बावनकुळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : वरूण राज्याच्या आशिर्वादाने सर्वत्र पर्जन्यवृष्टी होत आहे. शेतात रोवणीचे कामे जोमात सुरू आहेत. प्रत्येक शेतकºयाने आपल्या शेतात रोवणी सुरू केल्याने त्यांच्या घराचे दार बंद दिसत असून गावात शुकशुकाट दिसत आहे.शेतीच्याकामात सहपरिवार शेतकरी लागला असून शेतशिवारात काम करणाºया स्त्री पुरूषांसह अबालवृद्ध रोवणीच्या कामात व्यस्त झाले आहे. एकीकडे गावात दिवसभर शांत वातावरण तर दुसरीकडे शेतात काम आणि मनोरंजन दोन्ही सोबत चालत आहेत. शेतशिवारात बघितल्यास कुठे ट्रॅक्टरचा आवाज कुठे नांगर हाकणारा बैलाचा मागे पाऊल चालत आहे. कुणी पाळ कोपरते तर कुणी पºहे खोदत आहे.यात प्रमुख शेतकरी नांगरणी आणि चिखलणीच्या कामात, मुलगा कुदळ घेऊन बांधीचे खोपरे खोदताना तर म्हातारे वडील पºहे खोदताना दिसत आहेत. काही मोठे शेतकरी ट्रॅक्टरने चिखलणी करताना किंवा करवून घेताना दिसत आहेत. सकाळी ६ वाजेपासून तर सायंकाळी ७ वाजतापर्यंत चिखलणीच्या कामाची लगबग सुरू असून रोवणाºया महिला शेतात हजर होईपर्यंत चिखल तयार झाला पाहिजे याची एक लगबग शेतात दिसून येत आहे. सकाळी १० वाजेपर्यंत घरची प्रमुख महिलासगळ्यांची शिदोरी घेऊन येते आणि सकाळपासून चिखलाच्या कामात व्यस्त असलेल्या लोकांना जेवायला देते. यावेळी शेतात भरपोट जेवण करण्याचा आनंद काही वेगळाच असतो जेवण झाल्यावर थोडा वेळ विसावा नंतर लगेच पुन्हा कामाला सुरवात होते.पºहांच्या पेंढ्या चिखलात टाकणे आणि उर्वरित चिखलणीची पुन्हा तयारी करणे दुसरीकडे महिला मोठ्या उत्साहाने आपली उर्जा वापरत भात रोवणी करू लागत आहेत. चिखलात रोपे लावनू रोवणी करणे महिलाचे नित्यक्रम बनले आहे. दिवसभर चिखलात थकून परिश्रम करूनही दुसºया दिवशी सकाळी जागे होऊन पुन्हा शेतीच्या कामासाठी तयार राहणे हा क्रम सुरूच राहतो.