शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2022 05:00 IST

रात्री १० वाजतापासून सकाळी ६ वाजेपर्यंत डागडुजीचे काम सुरू असते. यादरम्यान वाहतूक एकेरी केली जाते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. रात्री वाहन काढणे कठीण होते. सकाळी १० वाजेपर्यंत वाहतूक कोंडी कायम असते. जिल्हा वाहतूक शाखा दररोज वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, वाहतूक कोंडी सोडविताना त्यांच्याही नाकीनऊ येत आहेत. सकाळी भंडारा शहरात अवजड वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. 

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या डागडुजीच्या कामाचा फटका वाहनधारकांना बसत असून गत दहा दिवसांपासून दररोज वाहतूक कोंडी होत आहे. दररोज सकाळी दोन्ही बाजूला वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागत आहेत. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांच्या नाकीनऊ येत असून सकाळी नोकरीनिमित्त जाणारे कर्मचारी, कामगार दोन ते तीन तास उशिरा कार्यालयात पोहोचत आहेत.भंडारा शहरातून मुंबई-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग जातो. बायपास नसल्याने संपूर्ण वाहतूक शहरातूनच होते. त्यातच वैनगंगा नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने संपूर्ण वाहतूक मोठ्या पुलावरून सुरू आहे. गत दहा दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या पावसाळापूर्व डागडुजीच्या कामाला सुरुवात झाली आहे. रात्री १० वाजतापासून सकाळी ६ वाजेपर्यंत डागडुजीचे काम सुरू असते. यादरम्यान वाहतूक एकेरी केली जाते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. रात्री वाहन काढणे कठीण होते. सकाळी १० वाजेपर्यंत वाहतूक कोंडी कायम असते. जिल्हा वाहतूक शाखा दररोज वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, वाहतूक कोंडी सोडविताना त्यांच्याही नाकीनऊ येत आहेत. सकाळी भंडारा शहरात अवजड वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना तासनतास खोळंबून रहावे लागते. सकाळी नोकरीनिमित्त भंडारा शहरात येणारे आणि साकोली व नागपूर येथे जाणारे कामगार आणि कर्मचारी त्रस्त झाले आहेत. कार्यालयात जाण्यासाठी सुमारे दोन तास उशीर होत असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. वाहतूक कोंडीने सर्वच जण त्रस्त आहेत.

एसटीची बससेवा प्रभावित

- सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीने एसटीची बससेवा प्रभावित झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. त्यात एसटी बसही खोळंबतात. राज्य परिवहन महामंडळाचे भंडारा विभागीय वाहतूक अधिकारी चंद्रकांत वडसकर म्हणाले, वाहतूक कोंडीमुळे भंडारा ते नागपूर मार्गावरील एसटी बसेस अर्धा ते एक तास उशिराने धावत आहेत. अनेक बसफेऱ्या प्रभावित झाल्या असून प्रवासी त्रस्त होत आहेत. महामंडळालाही आर्थिक फटका बसत आहे.३० मेपर्यंत डागडुजीचे काम- पावसाळापूर्व डागडुजीचे काम गत दहा दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गावर सुरू आहे. ३० मेपर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर मुजबी ते कारधापर्यंत पडलेले खड्डे बुजविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे वाहतूक एकेरी सुरू राहते. रात्रीच्यावेळी काम केले जात असले तरी दिवसभर वाहतूक संथगतीने सुरू असते.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी