जवाहरनगर : ''''वसुधैव कुटुंबकं '''' या उक्तीप्रमाणे ही सारी पृथ्वी जणू आपले कुटुंब आहे. पृथ्वीच्या रक्षणासाठी पर्यावरण टिकविणे काळाची गरज आहे,हे आपल्या '''' पर्यावरण जागृतीच्या मोहिमेतून '''' सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यवतमाळच्या २१ प्रणाली विठ्ठल चिकटे या तरुणीने. प्रणाली ही एका शेतकरी कुटुंबातील आहे. जिल्ह्यातील ठाणा(पे.पंप) येथे पोहोचली. याप्रसंगी ठाणा ग्रामपंचायतीच्या सदस्या . मंदा पुरुषोत्तम कांबळे ,वंदना बावणे, सीमा चोरमारे ,हिरा कांबळे, प्रमिला पासवान समीक्षा कांबळे , संचीता चोरमारे, आरती कुर्वे, काजल पासवान, मोहन पासवान, मनोहर मोहाडीकर ,कुणाल कांबळे, बापू कांबळे, मीना कांबळे, वैशाली ढोमणे ,ममता मोहाडीकर, लिला गजभिये तसेच ग्रामवासियांनी तिचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.शिवाय तिचा हा समाजजागृतीचा प्रवास यशस्वी व्हावा यासाठी सर्वांनी तिला शुभेच्छा दिल्या
पर्यावरण संरक्षण जनजागृतीसाठी सायकलने भ्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:28 IST