शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

तुमसर-देव्हाडी रस्ता बांधकामात डेरेदार वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:37 IST

संबंधितांनी दहा वर्षे देखभाल, नियोजन करण्याचा नियम आहे. संबंधित खात्याने त्याकडे गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. तुमसर-देव्हाडी रस्ता चौपदरीकरण ...

संबंधितांनी दहा वर्षे देखभाल, नियोजन करण्याचा नियम आहे. संबंधित खात्याने त्याकडे गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. तुमसर-देव्हाडी रस्ता चौपदरीकरण करण्यात आला. त्यापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूला डेरेदार ७० ते ८० वर्षे जुने असे मोठे वृक्ष होते. त्यांची संख्याही मोठी होती; परंतु रस्ता बांधकामात ती संपूर्ण झाडे कापण्यात आली. रस्ता बांधकाम पूर्ण झाले. पावसाळ्यात संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड केली. परंतु, वृक्ष लागवड केल्यानंतर त्याचे संगोपन व देखरेख होताना दिसत नाही. वृक्ष लागवड केल्यानंतर ती झाडे दिसत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्यांची कामे करण्यात आली. नवीन झाडे येथे डोळ्याला दिसत नाही. गवत मोठ्या प्रमाणात उगवले आहे.

रस्ता बांधकामात तोडण्यात आलेल्या झाडांच्या दुप्पट झाडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावण्याचा नियम आहे. तशा प्रकारचा करार पूर्वी करण्यात येतो. वृक्ष लागवडीनंतर सुमारे दहा वर्षे त्या झाडांचे संगोपन व देखरेख करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते. येथे रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली. परंतु, त्यांची देखरेख व संगोपन या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे झाडांची वाढ कशी होणार, हा येथे मुख्य प्रश्न निर्माण होत आहे.