शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
4
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
5
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
6
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
7
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
8
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
9
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
10
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
11
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
12
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
13
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
14
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
15
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
16
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
17
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
18
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
19
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
20
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...

परिवर्तनालाच पसंती

By admin | Updated: October 20, 2014 23:06 IST

भंडारा जिल्ह्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची लाट नसल्याचे सत्ता पक्षातील नेत्यांचे दावे भाजपच्या दणदणीत विजयानंतर सपेशल फोल ठरले. आघाडी शासनाला कंटाळलेल्या या मतदारसंघात मतदारांनी

आढावा निवडणुकीचा : मतांचे परिवर्तन घडवून आणण्यात भाजपला यशभंडारा : भंडारा जिल्ह्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची लाट नसल्याचे सत्ता पक्षातील नेत्यांचे दावे भाजपच्या दणदणीत विजयानंतर सपेशल फोल ठरले. आघाडी शासनाला कंटाळलेल्या या मतदारसंघात मतदारांनी राज्यातील सत्ता परिवर्तनात मोलाचा वाटा उचलला. जिल्ह्यातील तुमसर, भंडारा, साकोली या तिन्ही विधानसभा क्षेत्रात मोदी लाट दिसून आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्या. त्यात मोठ्या प्रमाणावर मतांचे विभाजन झाले. तरीसुद्धा काँग्रेस, राकाँ, शिवसेनेचा पराभव अनपेक्षित नाही, परंतु भाजपने घेतलेली आघाडी मात्र नक्कीच अनपेक्षित आहे. प्रत्येक ठिकाणी विजयाचा फरक २५ हजाराहून अधिक राहील, हे अपेक्षित नव्हते. खऱ्या अर्थाने हा काँग्रेस, राकाँ, शिवसेनेचा पराभव नसून आघाडी शासनाविषयी असलेला असंतोष आणि मोदी लाटेचा विजय आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.यावेळेच्या निवडणुकीत नवमतदार उत्साही होते. नवमतदारांना परिवर्तन पाहिजे होते. आघाडी शासनाचा भ्रष्टाचार हा मुद्दा आघाडीवर होता. त्यातच तुमसरात मागीलवेळी झालेल्या पराभवाचे शल्य होते. भंडाऱ्यात भाजपकडून शिवसेनेने हिसकावलेली जागा बळकवायची होती तर साकोलीत ही जागा कायम राखायची होती. त्यादिशेने तेव्हापासूनच पक्षाची बांधणी सुरु केली होती. या बांधणीचा पहिला फायदा जिल्हा परिषद, पंचायत समितीवर सत्ता संपादन केली. पक्षबांधणीचा लाभ लोकसभा जिंकण्यात झाला. त्यानंतर चार महिन्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत तिन्ही जागांवर दणदणीत विजय मिळवून जिल्हा भाजपमय असल्याचे दाखवून दिले. आता नगर पालिकेवर सत्ता संपादन करण्यासाठी भाजप आगेकूच सुरू होणार आहे.याउलट काँग्रेस, राकाँ, सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षाबद्दलची तळमळ कमी आणि स्वार्थभाव अधिक असल्यामुळे ते मतदारांपर्यंत कसे पोहोचले, याबद्दल शंकेचे वातावरण आहे. त्यातच सभोवताल वावरणाऱ्या चौकडीविषयीची नाराजी मात्र लपून राहिली नाही. (जिल्हा प्रतिनिधी)