शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

गोधन खरेदीला सापडेना ग्राहक

By admin | Updated: March 30, 2015 00:23 IST

अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यावर १५ हजाराची बैलजोडी केवळ ३ हजारात विकण्याचा बिकट ओढविलेला आहे.

मोहन भोयर भंडाराअस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यावर १५ हजाराची बैलजोडी केवळ ३ हजारात विकण्याचा बिकट ओढविलेला आहे. तुमसर व सिहोरा येथील गुरांच्या बाजारातील भाव घसरले आहे. हीच स्थिती भंडारा जिल्हयातील प्रत्येक बैलबाजारात बघायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी बाजारातून जनावरे परत नेली. रामपूर येथे जनावरे मेल्याची धक्कादायक माहिती आहे. गोवंश हत्याविरोधी कायदयामुळे जनावरे खरेदीदार मिळणे बंद झाल्याने बैल जिथे होते तिथेच ठेवून खरेदीदार निघून गेल्याचे चित्र आहे.महाराष्ट्र शासनाने नुकताच गोवंश हत्या विरोधी कायदा आणला. या कायद्याचा गुरांच्या बाजारात वास्तविक परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले. तुमसर येथे मंगळवार व सिहोरा येथे शनिवारी गुरांचा बाजार भरतो. तुमसर व सिहोरा गुरांची मोठी बाजारपेठ आहे. २० किमी अंतरावर मध्यप्रदेशाची सीमा सुरु होते. तेथूनही हजारो जनावरे या बाजारपेठेत विक्रीस येतात. सिहोरा व तुमसर बाजारपेठेतून हजारो गाई व बैल कसाई खरेदी करीत होते. त्यामुळे या जनावरांना मोठा भाव मिळत होता, परंतु शासनाने गोवंश बंदी कायदा आणल्याने या खरेदीदारांनी सध्या बाजाराकडे पाठ फिरविली आहे. त्याचा विक्रीवर परिणाम झाला.ज्या बाजारात पूर्वी १००० जनावरे विक्री करीता येत होती तिथे केवळ ३०० जनावरे विकत आहेत. जी बैलजोडी तथा जनावरे १५ हजाराला विक्री होत होती. तिची किंमत आता तीन हजारावर आली आहे. बैलांची विक्री कमी झाली आहे. त्यांचे खरेदीदार मिळेनासे झाले आहेत. जे बैल शेतकऱ्यांचे कामाचे नव्हते त्यांची किंमत पूर्वी ४ ते ५ हजाराला विकत होते. त्या बैलांना आता दोन हजाराला कुणी घेत नाही. त्या बैलाना वैरण मिळत नसल्याने त्यांचेवर मृत्यूची वेळ आली आहे. रामपूर येथे आठवड्यापूर्वी कामठीच्या व्यापाऱ्यांनी जनावरे खरेदी केली होती. बाजारात मूल्य कमी झाल्याने त्यांनी रामपूर येथील ग्रामस्थांना प्रति दिवस १५० रुपये चाऱ्याकरिता दिले होते. चारा नसल्याने त्या जनावरांचे हाल होत आहेत. पिण्याकरिता पाणी नाही. अशातच तीन दिवसापूर्वी तीन जनावरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. या जनावंराचे खरेदीदार कामठी येथे राहतात. सध्या ते ढूंकून पाहायला तयार नाहीत. प्रशासन येथे अनभिज्ञ दिसत आहे. जनावरांच्या मृत्यूमुळे गाव परिसरातील पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. तालुका तथा जिल्हा प्रशासनाने येथे दाखल देण्याची गरज आहे.