शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

मुद्रा लोन मार्च अखेरपर्यंत मिळणार

By admin | Updated: February 27, 2016 00:56 IST

'स्टेट बँकेची मुद्रा लोन देण्यास टाळाटाळ' या शिर्षकाखाली 'लोकमत'मध्ये वृत्त प्रकाशीत होताच जिल्हा प्रशासन व भाजपमध्ये एकच खळबळ उडाली.

कर्जाचे वाटप न झाल्यास आंदोलनाचा राजेश बांते यांचा इशारामोहाडी : 'स्टेट बँकेची मुद्रा लोन देण्यास टाळाटाळ' या शिर्षकाखाली 'लोकमत'मध्ये वृत्त प्रकाशीत होताच जिल्हा प्रशासन व भाजपमध्ये एकच खळबळ उडाली. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे मुद्रा लोन प्रचार प्रमुख राजेश बांते यांनी मोहाडी येथे धाव घेवून समस्या जाणून घेतली. तसेच स्टेट बँकेचे एजीएम यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली. व्यवस्थापक श्वेता साळवे यांनी मुद्रा लोन देण्यास होत असलेल्या विलंबाबाबत समस्या सांगितल्या. मार्चअखेर पर्यंत गरजुंना चौकशीअंती कर्ज वाटप करण्याचे आश्वासन दिले. बँक आॅफ इंडिया शाखा मोहाडी येथे सुद्धा भेट दिली. व्यवस्थापक प्रेमकुमार यांनी आतापर्यंत जवळपास १०० लोकांना मुद्रा लोन दिल्याचे व कोणत्याही अर्जदाराची तक्रार नसल्याचे सांगितले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वाकांक्षी मुद्रा लोन योजनेला येथील स्टेट बँकेद्वारे ठेंगा दाखविला जात असल्याने अनेक गरजुंची मोठी गैरसोय होत आहे. या बाबतचे वृत्त 'लोकमत'मध्ये प्रकाशित होताच लोकप्रतिनिधींनी याची गंभीर दखल घेत स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाला याचा जाब विचारला. शासनाच्या लोककल्याणकारी योजना राबविण्यास शासकीय अधिकारी कर्मचारी कुचराई करतात. ज्यामुळे सामान्य जनतेपर्यंत शासकीय योजना पोहचतच नाही. जनतेमध्ये असंतोष निर्माण होतो. मात्र असे गैरवर्तन आता खपवून घेतले जाणार नाहीत, असा सज्जड दम भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेश बांते यांनी दिला आहे.मार्च अखेर पर्यंत जर स्टेट बँकेतर्फे मुद्रालोन धारकांना कर्जाचे वाटप करण्यात आले नाही तर भाजपातर्फे बँकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजेश बांते यांनी दिला आहे. यावेळी रविकांत देशमुख नगरसेवक, नरेंद्र निमकर उपस्थित होते. बँक आॅफ इंडिया शाखा मोहाडीतर्फे आजपर्यंत जवळपास १०० लोकांना मुद्राकर्ज वाटप करण्यात आले आहे. मात्र स्टेट बँकेतून फक्त चार ते पाच लोकांनाच मुद्रा कर्ज देण्यात आल्याचे व जवळपास १५० अर्ज धुळखात पडले असल्याचे समजते. (शहर प्रतिनिधी)