शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:49 IST

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात पार पडलेल्या भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघातून कोण निवडून येणार याची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. मतमोजणी अवघ्या सहा दिवसांवर आली असून गावागावांत विजयावरुन दावे-प्रतिदावे सुरु आहेत. पक्ष कार्यकर्त्यांसह सर्व सामान्य नागरिकही आकडेमोड करण्यात सध्या व्यस्त आहे.

ठळक मुद्दे२३ मेच्या निकालाकडे लक्ष : विजयाचे दावे - प्रतिदावे, गावागावांत चर्चा, उमेदवारांचे वाढले टेंशन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात पार पडलेल्या भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघातून कोण निवडून येणार याची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. मतमोजणी अवघ्या सहा दिवसांवर आली असून गावागावांत विजयावरुन दावे-प्रतिदावे सुरु आहेत. पक्ष कार्यकर्त्यांसह सर्व सामान्य नागरिकही आकडेमोड करण्यात सध्या व्यस्त आहे. तब्बल ४२ दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मतमोजणी होत असल्याने उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले आहे.भंडारा - गोंदिया लोकसभा मतदार संघाची निवडणूक ११ एप्रिल रोजी पार पडली. ६८.२७ टक्के मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुध्दे, भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे, बसपाच्या उमेदवार विजया नंदुरकर यांच्यासह १४ उमेदवारांचे भाग्य यंत्रात बंद झाले. मतदानाच्या दिवसापासून विजयावर दावे-प्रतीदावे सुरु आहे. मात्र ठामपणे कोण विजयी होईल याचा अंदाज बांधणे राजकीय तज्ञांनाही कठीण झाले आहे.गावागावांत जातीय समीकरण आणि कोणता उमेदवार कुठे अधिक चालला यावरुन काथ्यकुट केले जात आहे. विजयावरून अनेकांनी पैजाही लावल्या आहे. निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्वशक्तीपणाला लावणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाचे समीकरण मांडण्यात मोठी चुरस दिसत आहे. बेरीज वजाबाकीच्या समीकरणातून कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे आपलाच उमेदवार विजयी होणारे असे गणीतही मांडले आहे.भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात राष्टÑवादी आणि भाजपा यांच्यात थेट लढत झाली. दोनही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते विजयाचे दावे करीत आहे. आता २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.मतमोजणीला अवघे सहा दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात उमेदवार सोबतच विजयाचे समीकरण मांडणाºया कार्यकर्त्यांचे हृदयाचे ठोके वाढले आहे. प्रत्येकजण विजयाचे दावे करीत असले तरी ठामपणे कुणीही विजयाची खात्री देतांना दिसत नाही.कोण किती मते घेणार?भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात ६८.२७ टक्के मतदान झाले. म्हणजे १२ लाख ३४ हजार ८९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात होते. विजयासाठी उमेदवाराला जवळपास ४२ ते ४४ टक्के मत हवे आहेत. यावरुन विजयासाठी उमेदवाराला जवळपास साडेपाच लाख मते हवी आहेत. आता कोणता उमेदवार किती मते घेतो आणि कोण विजयी होतो, यासाठी २३ मेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.अंदाज बांधणे कठीणलोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदार संघातून कोण विजयी होणार याचा अंदाज बांधणे सध्या तरी कठीण झाले आहे. दोन्ही पक्षाचे पाठीराखे आपला उमेदवार विजयी होईल असा दावा करीत असले तरी ठामपणे किती मताधिक्य राहिल हे मात्र कुणी सांगताना दिसत नाही.

टॅग्स :Electionनिवडणूक