शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

साकोलीतही वाईन शॉपसमोर मद्य शौकिनांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST

एवढी गर्दी तर राशनच्या दुकानातही पाहायला मिळाली नाही. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक घरातच होते. मात्र दारुची दुकान उघडताच तळीरामांनी एकच गर्दी केली. यावरून, ‘इंसान एक बोतल शराब के लिए, कतार में जिंदगी लेकर खडा हो गया, मौत का डर तो वहम था, आज नशा जिंदगी से बडा हो गया’ असे म्हणण्याची वेळ आली.

ठळक मुद्देआज नशा जिंदगी से बडा हो गया, पोलिसांच्या बंदोबस्तात दारू विक्री

संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : मागील दीड महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या भीतीमुळे अख्खा देश लॉकडाऊन आहे. भंडारा जिल्हा आॅरेंज झोनमध्ये असतानाच जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनंतर शनिवारपासून साकोली येथील वॉईनशॉप सुरु झाले. तालुक्यात एकच दारु दुकान सुरु झाल्याने परिसरातील मद्यप्रमींनी येथे एकच गर्दी केली.एवढी गर्दी तर राशनच्या दुकानातही पाहायला मिळाली नाही. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक घरातच होते. मात्र दारुची दुकान उघडताच तळीरामांनी एकच गर्दी केली. यावरून, ‘इंसान एक बोतल शराब के लिए, कतार में जिंदगी लेकर खडा हो गया, मौत का डर तो वहम था, आज नशा जिंदगी से बडा हो गया’ असे म्हणण्याची वेळ आली.लॉकडाऊनमुळे राज्यांचीच नाही तर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे शसनाने दारु दुकान सुरु करण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा रंगली आहे.कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी भीतीपोटी लॉकडाऊनमध्ये घरीच राहणे पसंत केले आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या घरी रोजगाराअभावी जेवणाची अडचण झाली. मात्र मद्यशौकिनांना याचे सोयरसुतक नसावे. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळतेच दारूविक्रीचे दुकान उघडणार आहेत, अशी माहिती मिळताच तळीरामांनी दारु दुकान उघडताच दारु खरेदीसाठी रांग लावली.गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र असे असले तरी दारु खरेदीसाठी लोकांचे लोंढेच्या लोंढे येतच होते. तर रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहनांचीही मोठी गर्दी झाली होती.राज्य शासनाने एकीकडे कोरोनाचे संक्रमण थांबावे यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून लॉकडाऊन यश्स्वी केला. मात्र दारु दुकान उघडून क्षणास लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.फिजिकल डिस्टन्सिंग नियमाचा फज्जाजिल्ह्यात दारूची दुकाने केव्हा उघडणार याची मद्यशौकिनांना चातकासारखी प्रतीक्षा होती. राज्यातील अन्य जिल्ह्यात दुकाने उघडताच भंडारा जिल्ह्यातील दारू दुकाने उघडतील अशी चर्चा गत आठवड्यात होती. मात्र दुकाने न उघडल्याने तळीरामांचा भ्रमनिरास झाला होता.निर्णयानुसार साकोली येथील वाईन शॉप सुरु झाली आहे. ही माहिती मिळताच तालुक्यासह अन्य ठिकाणच्या तळीरामांनी साकोलीच्या वाईन शॉपमध्ये एकच गर्दी केली. वाईन शॉप मालकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी दुकानासमोर सर्कल तयार केले. बासाचे बॅरिकेटस् लावले असले तरी दारु विकत घेण्यासाठी लोकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला. एवढ्या उन्हातही अनकजण दारुसाठी रांगेत लागले, हे एक नवलच आहे. दुपारी ४ वाजतापर्यंत दारू विक्री सुरू होती.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदा