शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

गर्दी, संपर्काचा जाच-आता बास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 5:00 AM

मानवजातीला संकटात टाकणाऱ्या कोरोना विषाणूची साथ रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाय केले जात आहेत. त्यात नागरिकांचा सहभागही अपेक्षित धरला जात आहे. त्यातलाच एक उपाय म्हणजे अनावश्यक गर्दी टाळणे हा होय. अनेक नागरिकांकडून हा उपाय गांभीर्याने घेतला जात नाही. या संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात असून गर्दी टाळण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे.

ठळक मुद्देसंसर्गाची वाढते भीती : संपर्क रुग्णाचा शोध घेणे होते अवघड

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मानवजातीला संकटात टाकणाऱ्या कोरोना विषाणूची साथ रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाय केले जात आहेत. त्यात नागरिकांचा सहभागही अपेक्षित धरला जात आहे. त्यातलाच एक उपाय म्हणजे अनावश्यक गर्दी टाळणे हा होय. अनेक नागरिकांकडून हा उपाय गांभीर्याने घेतला जात नाही. या संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात असून गर्दी टाळण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे.कोरोना विषाणूवरचा उपचार अद्यापि उपलब्ध नसल्याने त्याचा संसर्ग न होऊ देणे, हाच त्यापासून वाचण्याचा सध्याचा उपाय आहे. त्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. सार्वजनिक समारंभ, कार्यक्रम, जाहीर सभा याबरोबरच चित्रपटगृहे, नाट्यगृहे अशा गर्दी होणाºया ठिकाणांवर काही दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बार हेही बंद आहेत. आयटी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश देण्यात आले आहेत.कोरोनाबाधित व्यक्ती गर्दीत आली तर तिच्या संपर्कातून या विषाणूचा प्रसार त्वरेने होण्याची भीती असते. सार्वजनिक ठिकाणी कोरोनाग्रस्तांनी हाताळलेल्या वस्तू, त्याचे खोकणे, शिंकणे या माध्यमातून या विषाणूचा प्रसार होतो. कोरोनाबाधितांच्या उच्छ्वासातून, शिंकण्यातून बाहेर पडणाºया द्रवात डोळ्यांना न दिसणारे कोट्यवधी विषाणू असतात. त्याचा संपर्क झाल्यास अथवा श्वसनावाटे या विषाणूंचा संसर्ग होण्याची भीती असते.जिल्हा परीषद आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोटघरे यांनी सांगितले, की एखादा सेकंदही या प्रक्रियेसाठी पुरेसा आहे. त्यानंतर काही तासांनी किंवा त्या व्यक्तीची शारीरिक क्षमता जशी असेल, त्याप्रमाणे हा विषाणू कार्यान्वित होतो. प्रतिकारशक्ती जास्त असेल, तर तो विरूनही जातो किंवा मग त्वरेने परिणाम दर्शवतो. अशा वेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींनायाची लागण होऊ शकतो. त्यांच्याकडून पुन्हा आणखी काही जणांना अशा व्यक्ती शोधणे, त्यांना बरे होईपर्यंत वेगळे ठेवणे हे सगळे अशक्य होईल. त्यामुळेच गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे.जिल्हा रुग्णालयाचे निवासी अधिकारी डॉ. निखिल डोकरीमारे म्हणाले, ‘‘खोकल्याने किंवा शिंकल्याने तोंडातून उडणारा द्रवपदार्थ तीन फुटांच्या पलीकडे जाऊ शकत नाही. त्याच्या आतमध्ये त्याला जी जागा मिळेल त्यावर तो पडतो, जिवंत राहतो व त्यानंतर हाताच्या संसर्गातून शरीरात प्रवेश करतो. जागा मिळाली नाही तर तो विषाणू त्या द्रवाबरोबर जमिनीवर पडतो व विरून जातो. गर्दी करू नका, याचा अर्थ कोणत्याही व्यक्तीपासून तीन फुटांच्या किंवा त्यापेक्षाही जास्त अंतरावर राहा. गर्दीमध्ये हा विषाणू अगदी सहजपणे त्याला जागा मिळेल त्याप्रमाणे प्रवास करू शकतो. अनेकांना बाधित करू शकतो. त्यामुळे गर्दी टाळणे फायद्याचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या