शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जमावबंदीत मोहफुलाच्या दारु अड्ड्यांवर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 06:00 IST

देशी दारुचा पुरवठा करण्यासाठी मोहफुलाची चोरटी वाहतूक आधंळगाव पोलीस ठाणे हद्दीत केली जात आहे. मोहफुलापासून दारु तयार करण्यासाठी मोहाडी तालुक्यातील नदी तिरावरील गावांचा समावेश राज्य बंदी काळात आश्चर्याची बाब ठरत आहे. सर्वत्र जिल्ह्यात जमावबंदी आदेश असताना अवैध दारु अड्डयावर गर्दी कशी असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे.तिथे व्हायरस पसरला जात नाही का..? असा प्रश्न नागरिकांकडुन उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देमोहाडी तालुक्यातील प्रकार : दारुबंदी आदेशाचे होत आहे उल्लघंन, देशी दारुची चढ्या विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कआंधळगाव : कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी २१ दिवसांचा देशव्यापी बंद घोषीत करण्यात आलेला आहे. भंडारा जिल्ह्यासह राज्यस्तरीय सिमाही सिल करण्यात आलेल्या आहेत. त्यात दारु ही जीवनावश्यक बाबीत मोडत नसल्याने त्यावरील बंदी ही मद्यपींची चांगलीच तारांबळ उडविणारी ठरली आहे. मात्र देशी-विदेशी बंदमुळे मोहफुलाच्या दारु अड्ड्यांवर मद्यपींची गर्दी चांगलीच वाढत आहे.देशी दारुचा पुरवठा करण्यासाठी मोहफुलाची चोरटी वाहतूक आधंळगाव पोलीस ठाणे हद्दीत केली जात आहे. मोहफुलापासून दारु तयार करण्यासाठी मोहाडी तालुक्यातील नदी तिरावरील गावांचा समावेश राज्य बंदी काळात आश्चर्याची बाब ठरत आहे. सर्वत्र जिल्ह्यात जमावबंदी आदेश असताना अवैध दारु अड्डयावर गर्दी कशी असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे.तिथे व्हायरस पसरला जात नाही का..? असा प्रश्न नागरिकांकडुन उपस्थित केला जात आहे. सदर अवैध दारू विक्री नेमक्या कुणाच्या आशिवार्दाने हा गोरखधंदा फोफावत आहे ? असे नानाविध प्रश्न निर्माण झाले आहेत. जिल्ह्यातील सिमावर्ती भागात आंधळगाव परिसर वसलेला आहे. सध्या संचार बंदी आहे. मात्र पालेभाज्या व जीवनावश्यक साहित्याची वाहतूक सुरु आहे.फळभाज्यांची वाहतूक करणाऱ्या चारचाकी पीकअपचा दारू विक्री साठी वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. येथे ग्रामीण भाग सध्या मोहफुलाच्या दारुचे केंद्र ठरले आहे. आंधळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील, उसर्रा, जांब, कांद्री, लोहारा, रामपूर, गायमुख, सालेबर्डी व भिकारखेडा, धर्मापुरी आदी गावात मोहफुलाच्या दारुची विल्हेवाट लावली जात आहे. तर काही दुचाकी चालकांच्या सहाय्याने नदीच्या क्षेत्रातील गावात मोहफूलाच्या व दारू पोहचविले जात आहे. आंधळगाव येथे १०० रुपयांत देशी पव्वा, मोहा २० रुपये ग्लास, तर इंग्रजीला तर तोडच नाही, मागेल तोच दर दिला जात आहे., मोहाडी पोलीस ठाण्यात हद्दीत भिकारखेडा , धर्मापुरी मांडेसर येथे तर खुलेआम मोहफूलाची दारू विक्री सुरु आहे. सदर दारूने खरबी व सालई गावातील दोन लोकांचा मृत्यू झाला असल्याची घटना अलीकडच्या काळात घडली आहे. दारुची अवैध दारु विक्री होत असल्याने मोहाडी पोलिस ठाणे व आंधळगाव पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना अर्थपुर्ण व्यवहार दारू विक्रेत्यामार्फत केला जात असल्याची चर्चा आता जोर धरत आहे.इतर गावात मोहफुलाच्या दारूची गळती केली जात आहे. तालुक्यातील ग्रामीणसह शहरी भागात मोहफुलाच्या दारूचे अड्डे सर्रास सुरु आहेत. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतांना नेमक्या कुणाच्या आशिवार्दाने दारुची गळती व विक्री होत आहे, हा नेमका प्रश्न आहे.येथे ग्रामीण भागात बाहेरील जिल्ह्यातून आलेल्यांच्या वाढत्या संख्येमुळे धास्तावलेल्या ग्रामस्थांना आता मद्यपीमुळे व अवैध दारु अड्ड्यांमुळे संताप आल्याचे चित्र आहे. येथे चोविस तास शहराचे तथा गावागावाची गस्त लावणाºया पोलिस प्रशासनाला याची साधी भनकही कशी लागली नाही, हे विशेष! येथे कोरोनाच्या प्रादूर्भावाने देश हतबल होत असतांना अवैध दारुचे ठेके चालु असणे एका विशिष्ठ विभागाच्या कार्यप्रणालीवर सशंय व्यक्त करणारे ठरत आहे. याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे.मेंढा, चांदनी चौक, गणेशपूर येथे दारुड्यांची जत्राराज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १३ मार्चपासून लागू केला आहे. या कायद्यांतर्गत भंडारा जिल्ह्यातील सर्व बिअरशॉपी, वाईन शॉप, परमीट रुमबार, रेस्टारेंट, सर्व देशी दारुचे दुकाने १९ मार्चच्या सायंकाळी ५ वाजतापासून बंद केल्याने दारुसाठी मद्यपींची धडपड सुरु आहे. भंडारा शहरातील नेहरु वॉर्ड (मेंढा), चांदणी चौक, गणेशपूर येथे जणू दारुड्यांची जत्राच भरत आहे. त्यामुळे आजारावर नियंत्रण ठेवणे कठीण होणार आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी