शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परसोडी नाग येथे उसळणार भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:40 IST

पवित्र नागभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लाखांदूर तालुक्यातील परसोडी नाग येथे सोमवारला नागपंचमी निमित्ताने हजारो भक्तांची गर्दी उसळणार आहे. या गावाला यात्रेचे स्वरूप आल्याचे मागील अनेक वर्षापासुन दिसून येत आहे. दरवर्षी नागपंचमीला परसोडी नाग येथे तालुक्यातील व परीसरातील हजारो भाविक पुजा अर्चनासाठी येत असतात.

ठळक मुद्देआज नागपंचमी : श्रावण सोमवारनिमित्त जिल्हाभरात धार्मिक अनुष्ठान

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदुर : पवित्र नागभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लाखांदूर तालुक्यातील परसोडी नाग येथे सोमवारला नागपंचमी निमित्ताने हजारो भक्तांची गर्दी उसळणार आहे. या गावाला यात्रेचे स्वरूप आल्याचे मागील अनेक वर्षापासुन दिसून येत आहे. दरवर्षी नागपंचमीला परसोडी नाग येथे तालुक्यातील व परीसरातील हजारो भाविक पुजा अर्चनासाठी येत असतात.दरवर्षी येथे यात्रा भरत असल्याने स्थानिक लोकांना रोजगार ही या माध्यमातून मिळत आहे. सदर स्थळ पर्यटन व तिर्थस्थळ म्हणून विकसीत करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.सापाचे विषही होते निष्प्रभ!विरली बु. : परसोडी (नाग) येथील नागमंदिरात सर्पदंशाच्या अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले असून सापाचे विष निष्प्रभ करण्याची या मंदिराबाबत आख्यायिका कायम आहे. नागपंचमीनिमित्त या मंदिरात भव्य यात्रेचे परिसरातील हजारो भाविक आपापल्या गावातील दिंड्यासह सहभागी होऊन नागदेवतेचे दर्शन घेतात. यावर्षी जुलै महिन्यापासून आजपर्यंत या नागमंदिरात १२ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी ९ रुग्ण सुदृढ होऊन परत गेले. तर विश्वनाथ उके (२५) भागडी, अर्जुन मेश्राम (४७) अत्री, सुनीता वरठी (४०) साकोली या तीन रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती नागमंदिर देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मेहंदळे यांनी दिली.नागठाणा येथे नागपंचमीउसर्रा : नागराजस्वामी देवस्थान नागठाणा येथे समिती व गावकऱ्यांच्या वतीने उद्या नागपंचमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात नागपूजा, ध्वज आदी कार्यक्रम होणार असून याचा लाभ घेण्याची विनंती आयोजकाकडून करण्यात आली आहे.जनजागृती आवश्यकसमाजात आजही सापांबद्दल अनेक चुकीचा समज व्याप्त आहे. त्यामुळे सापांबद्दल जनजागृती आवश्यक आहे. अर्धेपेक्षा जास्त सापाच्या प्रजाती या बिनविषारी असतात. सर्पदंश झाल्यावर कोणत्या सापाने दंश केला याची माहिती नसते. परिणामी भीतीमुळेच रुग्णावर मानसिक परिणाम होतो.