शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
6
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
7
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
8
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
9
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
10
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
11
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
12
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
13
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
14
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
15
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
16
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
18
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
19
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
20
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

४० हजार हेक्टरमधील पीक धोक्यात

By admin | Updated: January 19, 2015 23:59 IST

वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरमधील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८९ टक्के रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे.

भंडारा : वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरमधील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८९ टक्के रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये पावसाच्या लहरीपणा व किडींचा प्रभावामुळे उत्पादन घटले. खरीप हंगामात धानाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांची भिस्त रबी पिकावर आहे. मात्र ढगाळ वातावरण, अकाली पाऊस, किडींचा प्रादूर्भाव आदी विविध कारणामुळे पीक संकटात आहेत. यावर्षीच्या रबी हंगामासाठी ४५ हजार ११५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित केले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने यासाठी ४५ हजार ११५ हेक्टर क्षेत्र रब्बी पिकांसाठी निर्धारित केले असले तरी शेतकऱ्यांनी आतापर्यंत ८९ टक्के पेरणी पूर्ण केली आहे. ४० हजार २१७ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी करण्यात आली. यावर्षी गहू पिकाची ९,२६५ हेक्टर क्षेत्रात गहू पिकाची लागवड करण्यात आली. हरभरा ८,८२० हेक्टर, लाख-लाखोळी ९ हजार ३९९, पोपट ७९३, वटाना ७८१, उडीद व मुंग एक हजार ९५, इतर कडधान्य ४ हजार २९९ हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकाची लागवड पूर्ण करण्यात आली.जवस २ हजार ७१३, मोहरी ५४, तीळ २५, गळीत पिके १ हेक्टर, एकूण गळीत धान्य ८३ हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड करण्यात आली आहे. भाजीपाला २ हजार ९५ हेक्टर, बटाटा १९५, मिरची ७९१ तर इतर रबी पिकांची ८१३ हेक्टर क्षेत्रात लागवड क्षेत्रात लागवड करण्यात आली.कृषी विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, भंडारा तालुक्यात रब्बी पिकासाठी ८ हजार ६३० हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी निर्धारित करण्यात आले होते. त्यापैकी ७ हजार ६८७ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आलेली आहे.पवनी तालुक्यात ८ हजार ९८० हेक्टर निर्धारित क्षेत्रापैकी ८ हजार ३८६, मोहाडी ५ हजार ७४० पैकी ५ हजार ५९२, तुमसर ४ हजार ६३५ हेक्टर क्षेत्रापैकी ५ हजार ५९७ हेक्टर क्षेत्रामध्ये रब्बी पिकाची लागवड करण्यात आली आहे.साकोली तालुक्यात ४ हजार ३३० हेक्टर क्षेत्रापैकी ३ हजार ५९७, लाखांदूर तालुक्यात ८ हजार ४५० हेक्टर क्षेत्रापैकी ६ हजार १४३ हेक्टरमध्ये, लाखनी तालुक्यात ४ हजार ३५० हेक्टर क्षेत्रापैकी ४ हजार २७ हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकाची लागवड करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)