शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

१०,१६३ हेक्टरमधील पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:34 IST

वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील १० हजार १६३ हेक्टरमधील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देवातावरण बदल : सिंचनाअभावी रबीची केवळ २२ टक्के पेरणी

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील १० हजार १६३ हेक्टरमधील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २२ टक्के रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे.धानाचे कोठार समजल्या जाणाºया भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये पावसाच्या लहरीपणा व किडींचा प्रभावामुळे उत्पादन घटले. खरीप हंगामात धानाचे नुकसान झाल्यानंतर शेतकºयांची भिस्त रबी पिकावर आहे. मात्र ढगाळ वातावरण, अकाली पाऊस, किडींचा प्रादूर्भाव आदी विविध कारणामुळे पीक संकटात आहेत.यावर्षीच्या रबी हंगामासाठी ४५ हजार ६८७ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित केले आहे. यासंदर्भात कृषी विभागाने यासाठी ४५ हजार ६८७ हेक्टर क्षेत्र रब्बी पिकांसाठी निर्धारित केले असले तरी शेतकºयांनी आतापर्यंत केवळ २२ टक्के पेरणी पूर्ण केली आहे. १० हजार १६३ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी करण्यात आलेली आहे.यावर्षी आजपर्यंत गहू पिकाची १,२७८ हेक्टर क्षेत्रात गहू पिकाची लागवड करण्यात आली.हरभरा १,१७३ हेक्टर, लाख-लाखोळी ३ हजार ८७६, पोपट १३२, वटाना ६५, उडीद ७०६, मुंग ७८४, बरबटी ११, मका १३ हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकाची लागवड पूर्ण करण्यात आली. जवस ८८३, मोहरी ६२, गळीत पिके १ हेक्टर, भाजीपाला ९९७ हेक्टर, बटाटा ५७, मिरची १२१ तर इतर रबी पिकांची ११७५ हेक्टर क्षेत्रात लागवड क्षेत्रात लागवड करण्यात आल्याची माहिती आहे.अनेक पिकांची पेरणी रखडलीजिल्ह्यात परतीचा पाऊस पडला असला तरी रबी पिकांसाठी समाधानकारक नसल्यामुळे अनेक पिकांची पेरणी रखडली आहे. जिल्ह्यात केवळ २२ टक्के रबीची पेरणी झाली आहे. मसूर, वाल, चवळी, मोट व उडीद, सूर्यफुल, करडई, तीळ, ऐरंडी आदी पिकांची पेरणी झालेली नाही. खरीप हंगामात शेतकरी मेटाकुटीला आला असून त्याची भर रबी हंगामात काढण्याचा शेतकºयांचा हेतू होता. मात्र ओलीताचे साधन नसल्यामुळे बहुतांश शेतकºयांनी रबी पिकांची पेरणी केलीच नाही. भंडारा तालुक्यात ७ हजार ६५१ सर्वसाधारण क्षेत्रापैकी कुठेच पेरणी केली नसल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. मोहाडी तालुक्यात ३७२ हेक्टर, तुमसर ५ हजार ५१४, पवनी १ हजार २७५, साकोली ४७४, लाखनी ४८७ तर लाखांदुरात २ हजार ४१ हेक्टर क्षेत्रात पेरणी केल्याची नोंद आहे.