शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

एका गंभीर क्षणी जनता दरबार स्तब्ध

By admin | Updated: March 5, 2017 00:29 IST

सुभाष वॉर्ड येथे पाण्याची टाकी आहे. त्या पाण्याच्या छायेखाली नगरधने नावाचा कुटूंब राहते. त्या कुटूंबातील शाळेत शिकणाऱ्या मुलींने कैफियत मांडली, ....

नाना पटोले म्हणाले, शेवटच्या व्यक्तीला प्रवाहात आणा : मोहाडीतील जनता दरबारात अधिकाऱ्यांना समजराजू बांते मोहाडीसुभाष वॉर्ड येथे पाण्याची टाकी आहे. त्या पाण्याच्या छायेखाली नगरधने नावाचा कुटूंब राहते. त्या कुटूंबातील शाळेत शिकणाऱ्या मुलींने कैफियत मांडली, सर, आम्ही केव्हाही मरु शकतो. हे एक वाक्य नानाभाऊच्या काळजाला भेदून गेले. त्यावेळी संपूर्ण जनतादरबार धीरगंभीर झाला होता. मोहाडीत अशी हेलवणारी बाब गंभीरतेने घेणारी संवेदनशील माणसे मोहाडीत नाहीत का? असा प्रश्न करुन मार्ग काढण्याचे निर्देश खासदार नाना पटोले यांनी दिले.मोहाडीत तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित जनता दरबारात खासदार नाना पटोले बोलत होते. मंचावर आमदार चरण वाघमारे, तहसिलदार धनंजय देशमुख, सभापती हरिश्चंद्र बंधाटे, नगराध्यक्ष स्वाती निमजे, उपसभापती विलास गोबाडे, बाबू ठवकर, युवराज जमईवार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर पंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी नाना पटोले म्हणाले, आम्ही जनतेचे सेवक आहोत. उणीदुणी काढण्यासाठी जनता दरबार नाही. प्रशासनात काम करताना अधिकाऱ्यांनी प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक विचार करावा. प्रत्येक काम माझे आहे. या दृष्टीने बघा. नकारात्मक मानसिकतेतून बाहेर पडा. लोकशाही सक्षम करण्यासाठी शेवटचा व्यक्तीला प्रवाहात आणा. जबाबदारी झटकू नका, अशी समज खासदारांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली.प्रशासनातील अडथळे दूर करण्यासाठी उपाययोजना कशी करावी यासाठी यावेळी नाना पटोले यांनी अधिकाऱ्यांना भावनिक साद घातली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या चुकीच्या पध्दतीने तयार झाल्याचा आरोप झाला. महसुल विभागाचे प्रतिनिधीत्व करणारे तहसिलदार धंनजय देशमुख यांच्यावर प्रश्नांची सरबती झाली. हे साहेब, कार्यालयात कमी अन् बाहेर अधिक राहतात. ग्रामीण जनतेशी इंग्रजीतून संवाद साधतात. अशी समस्या अनेकांनी मांडली. अनेक गावात बनावट शिधापत्रिकाधारक आहेत. वरठी येथे तब्बल २६५ शिधापत्रिका बनावट असल्याची तक्रार करण्यात आली. गरीबांच्या घरातील धान्य बाजारात जाते अन् काहींना अन्न मिळत नाही. हा प्रश्न गंभीर असून याची चौकशी सात दिवसात करा, याशिवाय गरज पडली तर मुंबईची टीम पाठवून आकस्मिक चौकशी करणार असल्याचे खासदारांनी खडसावले.अतिक्रमणासंबंधी दंड करु नका. फेरफार केले जात नाही. गॅस धारकाला रॉकेल मिळतो. संजय गांधी, श्रावण बाळ योजनेत घोळ आहे. अन्न सुरक्षा यादीत गरजू लाभार्थी सुटले. शौचालय, घरकूल, नाल्या, रस्ते समाज मंदिर आदी शासकीय योजनेसाठी रेती कशी मिळेल यातून मार्ग काढला जावा. रेतीचे क्षमता अधिक असलेले ट्रक रस्त्याने जातात, रस्ते खराब होतात. त्यासाठी रेती घाट बंद करण्याचा मानस खासदारांनी बोलून दाखविला. महसूलशिवाय प्रधानमंत्री विमा योजनेसाठी लाभार्थ्यांचे वेळेत प्रिमियम कापले जात नाही. यामुळे बँकेच्या चुकीमुळे वरठी येथील क्षिरसागर कुटूंबाला विमा कंपनीने लाभ दिला नाही. वनहक्काचे दावे २,४३२ अपात्र आहेत. हे दावे निकालात काढण्यासाठी वनहक्क समिती, तलाठी यांना एकत्र बोलावून प्रकरण निकाली काढण्याच्या सूचना तहसिलदारांना दिल्या. तालुक्यात किती डी.पी. लागतात याची माहिती घेऊन कळवा, असे सांगितले.धापेवाड्याचे पाणी मोहाडीच्या शेतीपर्यंत लवकरच पोहचणार आहे. विकासासाठी भांडण करु नका. प्रत्येकांच्या घरी योजना जावी, अशी माझी तळमळ आहे. सगळ्यांनी एकजुटीने कामाला लागा. भंडारा जिल्हा गरीबीतून बाहेर काढायचा आहे. विकासासाठी शेवटचा व्यक्ती प्रवाहात आणा. त्यांच्या तोंडातील घास हिसकावू नका. अधिकारी जनतेचे काम तळमळीने करीत नसल्याने संताप येतो. गरीबांचे अतिक्रमण नियमित करा. अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. पण, ज्यांनी व्यवस्थित काम केले नाही. जनतेला त्रास दिले तर त्याचे पोस्टमार्टमही केले जाईल, असे बजावून सांगितले. जनता दरबारात समस्या मांडण्यासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.