शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
6
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
7
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
8
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
9
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
10
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
11
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
12
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
13
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
14
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
15
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
16
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
17
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
18
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
19
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...

धानपिकाच्या दुबार पेरणीचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:27 PM

पावसासाठी चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसह नागरिकांना वरूणराजाने बुधवारी मुक्तहस्ताने हजेरी लावली. सकाळच्या सुमारास पाऊस चांगलाच बरसला. जिल्ह्यातील भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली आणि लाखांदूर या सातही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. परिणामी दुबार पेरणीचे संकट ओढावत असताना बळीराजाचा चेहऱ्यावरील संकटाचे ढग काहीसे दूर झाले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : २० मि.मी. पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसासाठी चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसह नागरिकांना वरूणराजाने बुधवारी मुक्तहस्ताने हजेरी लावली. सकाळच्या सुमारास पाऊस चांगलाच बरसला. जिल्ह्यातील भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली आणि लाखांदूर या सातही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. परिणामी दुबार पेरणीचे संकट ओढावत असताना बळीराजाचा चेहऱ्यावरील संकटाचे ढग काहीसे दूर झाले आहे. तुमसर, साकोली व भंडारा येथे दुपारपर्यंत २० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मोहाडीत पाऊस बरसलामृग नक्षत्रात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या होत्या. ज्याठिकाणी पाऊस बरसला व जिथे सिंचनाची सोय उपलब्ध आहे, अशा शेतकºयांनी खरीप हंगामांत धानाची पेरणी केली होती. त्यानंतर काही शेतकºयांनी पेरणी केली. परंतु पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले. अशा स्थितीत दुबार पेरणी करावी लागणार का? अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली होती.दरम्यान, काल मंगळवारी रात्रीपासून जिल्ह्यातील वातावरण ढगाळ बनले होते. बुधवार सकाळपासून पावसाच्या सरी बरसल्या. पावसाला सुरूवात होताच रेनकोट, छत्रीसह वाहनावर बसविणाऱ्या आच्छादनाची विक्रीही मोठ्या प्रमाणात होताना दिसली.अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडितलाखांदूर :या पावसाने लाखांदूर तालुक्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणने पावसाळ्यापूर्वी देखभाल व दुरुस्तीची कामे न केल्याने रात्री बराच वेळ अनेक भागातील वीज गायब होती. बुधवारीही अनेकवेळा वीज पुरवठयात व्यत्यय येत होता.या तालुक्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. मागील काही दिवस कडक उन व उकाडयाने हैराण झालेल्या व दुष्काळाने होरपळणाºया नागरिकांच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. शहर व परिसरात मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस झाला.मागील कित्येक दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला होता. पावसाळी धानाचे पºहे टाकल्यानंतर कृषीपंप नसलेल्या शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. काही शेतकºयांची पावसाअभावी पºहे वाळल्याने दुबार पेरणी केली होती. लाखांदूर तालुक्यातील सोनी, चप्राड येथे पावसासाठी शेतकºयांनी पुजापाठ सुरू केले होते. मात्र काल पावसाच्या चांगल्या सरी बरसल्या.