शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

गुन्ह्याचा आलेख कमी : गस्तीची गरज

By admin | Updated: February 28, 2015 00:47 IST

अड्याळ पोलीस ठाणे ब्रिटीश कालीन असून या ठाण्यांतर्गत सर्वच धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत सदर ठाण्याअंतर्गत ९० हजार ५१३ लोकसंख्या असून हे क्षेत्र शांतता प्रिय म्हणून ओळखले जातो.

अड्याळ / चिचाळ वार्ताहरअड्याळ पोलीस ठाणे ब्रिटीश कालीन असून या ठाण्यांतर्गत सर्वच धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत सदर ठाण्याअंतर्गत ९० हजार ५१३ लोकसंख्या असून हे क्षेत्र शांतता प्रिय म्हणून ओळखले जातो. पोलीस निरीक्षक अजाबराव नेवारे सहायक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल मोरे, डांगे यांनी गुन्ह्यांचा आलेख कमी करण्यामध्ये त्यांना यश आले आहे. कारण त्यांनी आखलेल्या सुनियोजित आराखडा व जनतेची विश्वास आहे. ही बाब अड्याळ पोलीस ठाण्यासाठी गौरवाची ठरली आहे.७९ गावे सांभाळताना कसरतअड्याळ पोलीस ठाणेअंतर्गत एकूण ७९ गावे येत असून अड्याळ शहराचा त्यात समावेश होतो. यामध्ये अड्याळ, गोसे बु., चिखली, माडगी, पहेला, कोंढा बिटाचा समावेश आहे. अड्याळ पोलीस ठत्तण्याचे ४ हजार ६८० चौरस कि़मी. लांब आहे. या ठाण्यांतर्गत गोसेखुर्द धरण येत असल्याने पर्यटकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे पोलिसांना त्याकडे लक्ष द्यावे लागते. अड्याळ आणि कोंढा येथील बाजारपेठ सर्वदुर परिचित असल्याने कायदा व सुव्यवस्थेची व्यवस्था सांभाळताना पोलिसासाठी दमछाक होत असली तरी नुकतेच ठाणेदार म्हणून आलेले अजाबराव नेवारे आल्यामुळे अड्याळ ठाणे क्षेत्रातील गुन्हेगारीचा आलेख घटल्यचे दिसून येत आहे.सदनिका जुन्या पण नूतनीकरण केलेल्याअड्याळ ठाण्याच्या आवारात अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यासाठी सदनिका बांधलेल्या आहेत. या सदनिकेत काही अधिकारी कर्मचारी सोडले तर बरेच पोलीस कर्मचारी सदनिकेत वास्तव्यास आहेत. सदनिका जुन्या असल्या तरी त्याची योग्य प्रकारे डागडूजी रंगरंगोटी केल्याने त्या सुंदर व देखन्या दिसत आहेत. मात्र नाल्याची दुरावस्था असल्याचे दिसते. ठाणेदाराचे निवास कक्ष व सहायक फौजदार व पोलीस उपनिरीक्षक यांचे स्वतंत्र कक्ष आहेत. पोलीस ठाण्यात पुरूष व महिला आरोपीन करीता स्वतंत्र कोठडी आहे.शहर व गावात गस्तीची गरजअड्याळ शहरात पोलिसांची गस्त नियमितपणे सुरू आहे. त्यामानाने खेडे विभागात गस्तीचे प्रमाण नग्यन आहे. रात्री ११ ते ५ वाजेपर्यंत गस्त सुरू असते. पोलीस निरीक्षक व कर्मचारी सुट्टीच्या दिवशीसुद्धा पेट्रोलींग करीत असतात.पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा अभावपोलीस ठाणे अड्याळ हे गाव राष्ट्रीय मार्गे क्रमांक २७१ वर असून पूर्व ते पश्चिम १० ते १५ कि़मी. व उत्तर ते दक्षिण १२ ते १५ कि़मी. असे क्षेत्रफळ आहे. यात ७९ गावाचा समावेश आहे. त्या मानाने येथे पोलीस कर्मचारी अपुरे आहेत. अड्याळ ठाण्याअंतर्गत ९ अधिकारी व ३२ कर्मचारी पदे मंजूर आहेत. परंतु ३ पोलीस अधिकारी असून ३० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. ६ अधिकारी २ पोलीस कर्मचारी पदे मंजुर आहेत. परंतु ३ पोलीस अधिकारी असून ३० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. ६ अधिकारी २ पोलीस कर्मचारी व २ पोलीस कर्मचारी प्रसुती रजेवर असल्याने ७९ गावाचा फायदा व सुव्यवस्था राखत असताना पोलिसांवर मोठ्या प्रमाणात ताण येतो.पोलिसांचे स्तुत्य उपक्रम पोलीस ठाण्यातर्फे राबविण्यात आलेल्या एक गाव एक गणपती या मोहिमेत अनेक गावांनी उत्स्फूर्तेने भाग घेतला. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक एकता घडवून आणली तसेच तंटामुक्त मोहिमे अंतर्गत सर्व ग्रामपंचायतीनी भाग घेवून गावातले तंटै गावातच मिटवल्यामुळे पोलिसावरचा ताण कमी झाला आहे. रस्ता सुरक्षा सप्ताह, महिला समुपदेशन केंद्र, पतनाट्य गावा गावात ग्रामसभा घेवून जागृतीतून अनेक समस्या मार्गी लावल्या तसेच ठाण्यांतर्गत येणाऱ्या ६१ गावात पोलिसाच्या पुढाकाराने दारूबंदी घडवून आणण्यात आली. मटका जुगार व सट्टा या धंद्यावरही पोलिसांनी लगाम कसलेला आहे. पोलीस पाटील व तंटामुक्त अध्यक्षाची महिन्यातून एकदा बैठक घेण्यात येते.घोड्याची यात्राअड्याळ येथील विदर्भातील जागृत हनुमंताचे मंदीर असून येथे रामनवमीला नऊ दिवसाची घोडायात्रा भरते. त्यावेळी बंदोबस्त करताना अपुऱ्या पोलिसांना बंदोबस्त ठेवताना नाकी नव येत असते, अशावेळी ठाण्यांतर्गत येणाऱ्या एखाद्या गावात अनुचित घटना घडल्यास पोलिसांची तारांबळ उडते. गोसे बिटला पोलीस चौकीची गरजसदर बिटमध्ये विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्प असून येथे देश विदेशातील पर्यटकांची रोजच वर्दळ असते. त्याचे आणि धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोसे येथे पोलीस चौकीची गरज असल्याचे अनेक पर्यटकांचे म्हणणे आहे.