शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
3
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
4
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
5
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
6
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
7
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
8
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
9
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
10
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
11
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
12
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
13
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
14
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
15
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
16
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
17
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
18
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
19
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
20
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?

दोन्ही गटांतील ३९ जणांवर गुन्हे

By admin | Updated: December 23, 2016 00:29 IST

नगर पालिका निवडणुकीच्या वादातून बुधवारला लायब्ररी चौकात दोन गटात झालेल्या मारहाणीचे पडसाद आज दुसऱ्या दिवशीही कायम आहे.

दुकाने बंदच : लायब्ररी चौकात दुसऱ्या दिवशीही तणावसदृष्य स्थिती भंडारा : नगर पालिका निवडणुकीच्या वादातून बुधवारला लायब्ररी चौकात दोन गटात झालेल्या मारहाणीचे पडसाद आज दुसऱ्या दिवशीही कायम आहे. या परिसरात तणावसदृष्य स्थिती कायम असून त्या परिसरातील दुकाने आजही बंदच होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त असून दोन्ही गटातील ३९ जणांविरूद्ध भंडारा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास नगर पालिका निवडणुकीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटांकडून तलवारी निघाल्या. या घटनेत दोन्ही गटातील चार जण जखमी झाले. त्यामुळे या परिसरात बराच वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती, ती स्थिती आजही कायम होती. चौकातील फुटपाथवरील फेरीवाले तथा अन्य दुकाने बंद होती. यावरून कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कालपासून या परिसरात पोलीस ताफा तैनात आहे. कुठलीही अप्रिय घटना घडू नये यसाठी पोलिसांची करडी नजर यासंपूर्ण प्रकरणावर आहे. यादरम्यान एका गटातर्फे फिर्यादी मकसुद खान मंजूर खान रा.भंडारा तथा दुसऱ्या गटातील फिर्यादी ईमरान बबलुभाई मिर्झा रा.भंडारा यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भादंवि ३२३, ३२४, ३२६, ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९, सहकलम १३५ महाराष्ट पोलिस कायद्यान्वये गुन्हे नोंदविले आहेत. यात एका गटातील १९ तर दुसऱ्या गटातील २० जणांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक मोरे व गायकवाड करीत आहेत. (प्रतिनिधी) शहरातील अतिक्रमण हटवा भंडारा नगर पालिका प्रशासनाने मागीलवेळी शहरातील अतिक्रमण हटविले होते. त्यानंतर काही दिवसातच संपूर्ण शहरातच अतिक्रमणाने पाय पसरले. याला मुख्य मार्ग, लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक, शास्त्री चौकही अपवाद नाही. अतिक्रमणामुळे चौकाचे सौंदर्य झाकले गेले आहे. आधीच रस्ता अरूंद असताना वाढत्या अतिक्रमाणमुळे या समस्येत दिवसागणिक वाढ होत आहे. नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मुलनावर ठोस पावले उचलण्याची गरज आहे.