शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
2
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
3
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात
5
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
6
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
7
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
8
'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
9
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
10
ऐतिहासिक पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील तळघरात आतापर्यंत काय काय सापडलं?
11
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
12
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
13
Mr. & Mrs. Mahi Movie Review : राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या अभिनयाचा 'षटकार'
14
मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा
15
कोकण पदवीधरमधून मनसे उमेदवारी मागे घेणार का? अभिजीत पानसेंनी सगळंच सांगितलं
16
मुंबईत उद्या ‘जम्बो’ हाल होणार; ५३४ लोकल फेऱ्या रद्द!
17
भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार
18
"बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते", परकीय गुंतवणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!
19
मुंबई महानगरात ४० पेक्षा अधिक मजल्यांच्या तब्बल १५४ इमारती, २०३० पर्यंत ३६१ होणार!
20
"तो निर्णय संघ व्यवस्थापनाचा होता, यात विशेष काही नाही", जितेश शर्माच्या मनाचा मोठेपणा 

विजेच्या धक्याने गाय, म्हैश ठार; तीन घरांचे अंशत: नुकसान

By युवराज गोमास | Published: April 11, 2024 5:05 PM

जिल्ह्यात आठवडाभरापासून अवकाळी वादळी पावसाचा तडाखा बसतो आहे. ४३ अंशावर पोहचलेली पारा एकदम ३१ अंशावर उतरला आहे.

भंडारा : जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी वादळी पावसासह वीज कोसळल्याने दोन पशुंची हानी झाली. मोहाडी तालुक्यातील मौजा रोहणा येथील भाष्कर दामू पोटफोटे यांची म्हैश तर लाखनी तालुक्यातील मेंगापूर येथील सत्यपाल विठोंबा खंडाईत यांची गाय बुधवारला रात्रीच्या सुमारास विजेच्या धक्याने मरण पावली. मोहाडी व तुमसर तालुक्यात ३ घरांचे अंशत: नुकसान झाले. पारा ३१ अंशावर उतरला. निवडणूक प्रचाराला अडथळा आला असून पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात आठवडाभरापासून अवकाळी वादळी पावसाचा तडाखा बसतो आहे. ४३ अंशावर पोहचलेली पारा एकदम ३१ अंशावर उतरला आहे. थंडी वाजायला सुरूवात झाली आहे. बुधवारला मध्यरात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. ग्रामीण, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय महामर्गावर ठिकठिकाणी पाणी साचून चिखलाचे साम्राज्य पहावयास मिळाले. लग्न सोहळे व लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावर परिणाम जाणवला. उन्हाळी पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे.जिल्ह्यात सध्या भंडारा-गाेंदिया लोकसभा मतदार संघासाठी प्रचाराला वेग आला आहे. उमेदवारांची प्रत्येक गावात पोहचण्याची धडपड सुरू आहे. परंतु, निवडणुकांच्या रणधुमाळीत वातावरणाचा अडथळा येत आहे. प्रचारसभा सुरू असताना वादळी वारा व पाऊस होत असल्याने मतदार घराकडे पळ घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बुधवारला सकाळच्या सुमारास पाऊस बरसत राहिल्याने उमेदवारांना प्रचार सभा घेता आल्या नाहीत.

रस्त्यांवर पडलेल्या खोल खड्ड्यांत पाणी साचल्याने चिखलातून वाहने घसरून अनेकजण किरकोळ जखमी झाले. लोंबीवर असलेला धान पीक जमिनीवर लोळला. फुलांवर असलेल्या उन्हाळी मूंगाचे मोठे नुकसान झाले.आठवडी बाजारांना फटका

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आठवडी बाजार भरतात. परंतु, ऐन बाजाराच्यावेळी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसत असल्याने व्यावसायिकांची तारांबळ उडत आहे. शिवाय ग्राहकांची संख्या रोडावत असल्याने व्यावसायिक नुकसानही होत आहे.बॉक्स

वीटभट्टी व्यावसायिकांचे मोडले कंबरडे

जिल्ह्यात वीटभट्टी व्यवसायातून ग्रामीणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. परंतु, आठवड्यापासून होत असलेल्या अवकाळीने कच्च्या विटांचे नुकसान होत आहे. नुकसान वाढण्याच्या भीतीने व्यावसायिकांनी विटभट्टीचा व्यवसाय थांबविल्याने ग्रामिणांचा रोजगार बुडाला आहे.जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह वादळी अवकाळी पाऊस बरसत असल्याने नागरिकांनी सावध असावे. वीज लखलखत असताना घराबाहेर जाण्याचे टाळावे. वादळी वाऱ्यात झाडांखाली थांबू नये. हवामान खात्याचा अंदाज घेत शेतीच्या कामांचे नियोजन करावे. - अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, भंडारा.

टॅग्स :Rainपाऊस