शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात दिसणार भंडाऱ्याचा 'हौसला और रास्ते'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:15 IST

भंडारा जिल्ह्यातील युवकांनी पुढाकार घेऊन विविध राज्यातील कलावंतांना घेऊन तयार केलेला 'हौसला और रास्ते' या लघुचित्रपटाची दिल्ली येथे होऊ घातलेल्या सातव्या दिल्ली आंतरराष्ट्रीय लघु-चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली असून २८ आॅक्टोबरला त्याचे प्रदर्शन होणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील युवकांची झेप

देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा जिल्ह्यातील युवकांनी पुढाकार घेऊन विविध राज्यातील कलावंतांना घेऊन तयार केलेला 'हौसला और रास्ते' या लघुचित्रपटाची दिल्ली येथे होऊ घातलेल्या सातव्या दिल्ली आंतरराष्ट्रीय लघु-चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली असून २८ आॅक्टोबरला त्याचे प्रदर्शन होणार आहे. जगभरातील विविध ठिकाणचे चित्रपट या महोत्सवात दाखवले जातील. त्याचबरोबर जगप्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवात देखील हा लघुचित्रपट दाखवला जाणार आहे.या लघुचित्रपटात गुजरातमधील अभिनेता मौलिक चव्हाण आणि नागपूर येथील हिमांशी कावळे, औरंगाबादचे सुरेश जोशी प्रमुख भुमिकेत आहेत. विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यातील लाखनीतील प्रसिद्ध नाट्यकलाकार संजयराव वनवे, उद्योजक अतुल पाटील भांडारकर, अंजली भांडारकर, तुमसर येथील सरोजलता बर्वे, स्वप्निल जांगळे या कलावंतांनीदेखील या चित्रपटात भूमिका केल्या आहेत.नुकतेच या चित्रपटाचे 'ट्रेलर' रिलीज झाले असून यू ट्यूब आणि सोशल मिडियावर त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. मुंबईस्थित प्रशांत चव्हाण यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी' तसेच संगीत दिग्दर्शन देखील केले आहे. गुजरात येथील अक्षित रोहडा यांनी सहाय्यक सिनमॅटोग्राफर म्हणून भूमिका निभावली आहे. इमरान शेख या चित्रपटाचे इन्स्ट्रक्टर तर व्यंकट भोंडेकर यांनी लाईटमॅनची भूमिका पार पाडली आहे.निर्माते चेतन भैरम असून सहनिर्माता प्रशांत वाघाये आणि कार्यकारी निर्माता योगेश भोंडेकर आहेत. मुळचे तुमसरचे असलेले सध्या मेड्रिड (स्पेन) येथे राहत असलेले रोशन भोंडेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.दिल्ली येथे होत असलेल्या चित्रपट महोत्सवास चेतन भैरम, प्रशांत वाघाये, इमरान शेख, योगेश भोंडेकर, अतुल भांडारकर यांची उपस्थिती लागणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन भंडारा येथे होत आहे.विदर्भात कलाकारांची कमी नाही. 'हौसला और रास्ते' च्या माध्यमातून त्यांच्या कलेला वाव मिळावा आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्यासह चित्रपट क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकिक व्हावा, या दृष्टीने केलेला हा प्रयत्न आहे. त्याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे.रोशन भोंडेकर, दिग्दर्शक तथा पटकथा लेखक

टॅग्स :cultureसांस्कृतिकartकला