शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

एक क्विंटल धानासाठी खर्च २५०० रुपये अन् हमी भाव मिळतो केवळ १८६८ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 05:00 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : निसर्गाच्या अवकृपेचा सामना करणाऱ्या धान उत्पादक शेतकऱ्यांना यंदा तुडतुड्याने उध्वस्त केले आहे. उत्पन्नापेक्षा ...

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : ७०० रुपये बोनस धान उत्पादकांना दिलासा देणार

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाच्या अवकृपेचा सामना करणाऱ्या धान उत्पादक शेतकऱ्यांना यंदा तुडतुड्याने उध्वस्त केले आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक अशी अवस्था झाली आहे. मशागत, बियाणे, रोवणी, फवारणी, कापणी, बांधणी, मळणी यावर साधारण २२ हजार रुपये खर्च होतो. २० ते २५ क्विंटल धानाचे उत्पादक अपेक्षित असते. मात्र यंदा निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांना एकरी ७ ते १० क्विंटल धानाचा उतारा येत आहे. एक क्विंटल  धान उत्पादनासाठी सरासरी २५०० रुपये खर्च येतो. मात्र शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरत नाही. धानाचे हमीभाव १८६८ रुपये आहे. शेतकऱ्यांना गत काही वर्षांपासून बोनस मिळत असल्याने थोडा दिलासा मिळतो. यंदाही धानाला ७०० रुपये बोनस मिळण्याची आशा आहे. जिल्ह्यात  आधारभूत धान खरेदीला प्रारंभ झाला आहे. शेतकरी धान विक्रीसाठी आधारभूत केंद्रावर येत आहे. मात्र गत काही वर्षाचा अनुभव पाहता यंदाही शेतकऱ्यांना घाटाच सहन करावा लागत आहे.

बोनसची प्रतीक्षाधान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळत असल्याने कशीतरी खर्चाची तजवीज होते. यंदा ७०० रुपये बोनसच्या घोषणेची प्रतीक्षा आहे.

उत्पादन खर्च भरमसाठगत काही दिवसात मजुरीच्या खर्चासह बियाणे,  कीटकनाशक आणि खतांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. एकरी साधारणत: २२ हजार रुपये खर्च होत आहे. मशागतीसाठी सात हजार, बियाणे दोन हजार, कीटकनाशक व रासायनिक खतासाठी पाच हजार कापणी व बांधणीसाठी ३५००, मळणीसाठी २५०० रुपये व इतर खर्च येतो. 

कीटकनाशक किमती

गत काही वर्षांपासून सर्वसाधारण प्रतीच्या धानावर कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. यंदा तुडतुड्याने शेतकऱ्यांना उध्दवस्त केले. तुडतुडा नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना साधारणत: एकरी तीन ते पाच हजार रुपये खर्च आल्याचे सांगत आहे.

वातावरणातील बदलाने धान पीक सुरूवातीपासूनच कीडीच्या अधिन झाले. गादमाशीचा त्रास वाढल्याने नियंत्रणाचा खर्च मोठा झाला. गर्भावस्थेत धान असताना तुडतुडा आला. एकदा नव्हे पाचदा कीटकनाशकांची फवारणी करूनही उपयोग झाला नाही. गतीवर्षीपेक्षा यंदा निम्मे उत्पन्नही होते की नाही, अशी शंका आहे. - आनंदराव हटवारशेतकरी 

उत्पादन खर्च व हाती येणारे उत्पन्न यात बरीच तफावत यंदा जाणवणार आहे. खताच्या कीटकनाशकाच्या व मजुरीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तुलनेत गतवर्षीपेक्षा हमीभावात केवळ ५३ रुपयेच वाढ झाली. १८३८ रुपये हमीभाव मिळत आहे. आता धानाची शेती तोट्याची झाली असून सरकारने यावर विचार करणे गरजेचे आहे. तरच शेतकरी तरेल.- प्रशांत खागरशेतकरी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती