शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

खर्च एक लाख, उत्पादन एक छदामही नाही, शेतकऱ्याने पेटविले चार एकारांतील उभे धान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2022 15:38 IST

लाखांदूर तालुक्यातील इटान येथील प्रकार

हरिश्चंद्र कोरे

विरली (भंडारा) : अतिवृष्टी आणि किडींच्या आक्रमणाने धान पिकातून मजुरीही हाती येण्याची शक्यता नसल्याने हतबल झालेल्या एका शेतकऱ्याने चक्क चार एकरांतील उभा धान पेटवून दिला. ही घटना लाखांदूर तालुक्यातील इटान येथे बुधवारी घडली. खर्च एक लाख, उत्पादन एक छदामही येत नसल्याने धानाला आग लावून दिल्याने शेतकऱ्याने सांगितले.

दादाजी गणपत ठाकरे, रा कऱ्हांडला, ता. लाखांदूर असे उभे धान पेटविणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव आहे. त्यांची इटान शिवारात दोन एकर शेती आहे. त्यांच्या शेतातला लागून असलेली नागपूर येथील स्वानंद देशकर यांची चार एकर शेती बटईने केली. सुरुवातीला पऱ्हे पुराने गेले. दुबार पऱ्हे टाकून रोवणी केली. भरघोस उत्पादनासाठी मेहनत घेतली. रात्रंदिवस शेतात राबले. रासायनिक खते व कीटकनाशकांची मात्रा दिली. यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च झाला. धानाचे पीक जोमदार आले. भरघोस उत्पन्न मिळण्याची आशा होती. मात्र, धानचा निसवा झाल्यानंतर पेरवा आणि तुडतुड्याने आक्रमण केले.

चार एकर शेतीतून दहा किलोही धानही पदरात पडण्याची आशा नव्हती. कापणीसाठी मजुरी द्यायची कुठून? अशा विवंचनेत ते सापडले होते. अशातच ते बुधवारी आपल्या शेतात गेले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास बटईने केलेल्या शेतातील धानाला आग लावून दिली. अवघ्या काही तासांत चार एकारांतील धान जळून नष्ट झाला. सायंकाळी हा प्रकार गावात माहीत झाल्यावर अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतशिवारात धाव घेतली.

खरीप हंगामात चांगले उत्पादन मिळविण्यासाठी मेहनत घेतली. शेतीत पैसा ओतला; पण दुर्दैवाने सर्व होत्याचे नव्हते झाले. नाइलाजाने उभे धान पेटविण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? शासनाने नुकसानभरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे.

- दादाजी गणपत ठाकरे, धान उत्पादक शेतकरी, कऱ्हांडला

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीbhandara-acभंडारा