शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

‘म्युकरमायकोसिस’ आजारावरील खर्च जाणार आवाक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:35 IST

जिल्ह्यात सध्या म्युकरमायकोसिसचे चार रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दोन रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात, तर उर्वरीत दोन रुग्णांवर खासगी रुग्णालयात ...

जिल्ह्यात सध्या म्युकरमायकोसिसचे चार रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दोन रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात, तर उर्वरीत दोन रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या आजाराला ‘झिगॉमायकोसिस’ म्हणून ओळखले जाते. एखाद्या आजारपणामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असेल तर हे संक्रमण बहुतेक वेळा उद्भवते. उच्च रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह, अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींमध्ये याचे गंभीर स्वरूप पाहावयास मिळते. याकरिता उपचार घेणे महत्त्वाचे आहे. उपचार न घेतल्यास म्युकरमायकोसिस प्राणघातकही ठरू शकतो.

म्युकरमायकोसिस संक्रमित होणारा आजार नाही. म्हणून संक्रमित व्यक्तीकडून तो आजार दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकत नाही. मात्र, या प्रकारच्या संसर्गापासून बचाव करण्याचा उत्तम उपाय म्हणजे स्वतःची काळजी घेणे, वैयक्तिक स्वच्छतेकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे.

आपली प्रतिकारशक्ती दुर्बल असल्यास, घराबाहेर स्वत:ला सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही ठिकाणी काम करताना मास्क घातल्यास आणि पूर्ण बरे होईपर्यंत सर्व जखमांवर नियमित मलमपट्टी करीत राहिल्यास बुरशीजन्य संसर्ग रोखणे शक्य होईल.

उन्हाळ्यात आणि शरद ऋतूतील महिन्यांमध्ये अतिरिक्त सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, कारण या वातावरणात बुरशीचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक असते. म्युकरमायकोसिस या आजाराची माहिती आपल्या सर्वांना उपयुक्त ठरेल यात शंका नाही. प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक झाले आहे. वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

म्युकरमायकोसिसची अशी आहेत लक्षणे

म्युकरमायकोसिस हा आजार म्युकोर्मिटाईड मोल्ड्सच्या संपर्कातून उद्भवतो. हे जीव पाने, कंपोस्टचे ढीग, माती, सडणारे लाकूड यात आढळतात. हे प्रभावित श्वसन यंत्रणेस संसर्गित करते व त्यातून म्युकरमायकोसिस आजार उद्भवतो. याला फुप्फुसीय संसर्ग म्हणून संबोधले जाते.

यात प्रामुख्याने खोकला, ताप येणे, डोकेदुखी, नाक बंद, सायनस, वेदना, दातांमधे तीव्र वेदना, दात हलणे, हिरड्यांमधून पू येणे, तोंडातून दुर्गंधी येणे, टाळूवर एखादा काळा चट्टा येणे, नाकातून पू येणे, दृष्टी कमी होणे, डोळे लाल होणे, चेहऱ्यावर सूज येणे वा बधिरता येणे, जबड्याचे हाड उघडे पडणे, त्वचा काळसर होणे, त्वचेवर मेदयुक्त फोड व लालसरपणा येणे, शरीराला सुज येणे अशी लक्षणे आहेत.

अल्सर या आजारामुळे प्रसंगी वरचा डोळा व जबडा गमवायची वेळ येऊ शकते. तसेच मेंदूपर्यंत संसर्ग पोहोचल्यास प्रसंगी मृत्यूही संभावतो. यावर ‘ॲम्फोरेटीसीन बी’ हे इंजेक्शन प्रभावी असून, ते महागडे पण आहे.

काय आहे उपाय

वेळीच निदान आणि उपचार केल्यामुळे या आजारामुळे होणारे संभाव्य दुष्परिणाम टाळता येतात. यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. कोरोनाच्या उपचारादरम्यान स्टेरॉईडचा आवश्यक तेवढाच वापर गरजेचा असून, अतिरिक्त वापर टाळणे अत्यावश्यक. प्रतिजैविकांचा (अँटिबायोटिक्स) तारतम्याने वापर आवश्यक आहे. उपचारांतर्गत अँटी फंगल ट्रीटमेंटची गरज असेल तर सर्जरी करून बाधित झालेला भाग काढून टाकला जातो. यासाठी दंत शल्य चिकित्सक, ओरल आणि मॅकझिलोफ़ेशियल सर्जन, कान-नाक-घसा तज्ज्ञ, न्यूरोसर्जन व फिजिशियन यांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.