शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नगरसेवकाची इंदूरवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 21:21 IST

बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांनी गंडविणारा तुमसर येथील नगरसेवक श्याम धुर्वे विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर शहरातून पसार होत इंदूर शहराची पाहणी करण्याकरिता पालिका पदाधिकाऱ्यांसह इंदूरवारी करीत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

ठळक मुद्देपोलिसांचे मौन : कारवाईकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह तुमसरवासीयांची नजर

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांनी गंडविणारा तुमसर येथील नगरसेवक श्याम धुर्वे विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर शहरातून पसार होत इंदूर शहराची पाहणी करण्याकरिता पालिका पदाधिकाऱ्यांसह इंदूरवारी करीत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. याबाबत पोलिसांशी चर्चा केली असता त्यांनी कमालीचे मौन बाळगून उडवाउडवीचे उत्तर देत आहेत.अनेक बेरोजगार तरुणांना कृषी, पणन, जलसंपदा, रेल्वे यासह शासनाच्या अन्य विभागात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून नगरसेवक श्याम धुर्वे याने बेरोजगार तरुणाकडे लाखो रुपये घेतले. तर काहींना खोटे नियुक्ती पत्रही दिले होते. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दि.१३ आॅगस्ट रोजी तुमसर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यादिवशी पासून नगरसेवक श्याम धुर्वे शहरातून पसार झाले आहेत. श्याम धुर्वे हे भाजपा समर्थीत पक्षाचे आताचे नगरसेवक असून ते पूर्वीचे भाजपाचेच नगरसेवक होते. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे आज ११ दिवसांचा कालावधी लोटला तरी पोलिसांनी त्या नगरसेवकास पकडून साधी विचारपूसही केली नाही की कोणते पुरावे गोळा केले नाही. या ऐवजी एखादा सर्वसामान्य व्यक्ती किंवा विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असता तर पोलिसांनी जीवाचे रान करून त्याला तुरुंगात डांबले असते. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नाराजी दाखवित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तात्काळ अटक करण्याकरिता निवेदन दिले आहे. मात्र पोलिसांना धुर्वेचा ठावठिकाणा माहित नसल्याचे त्यांच्याकरवी सांगितले जात असतानाच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तुमसर शहर स्वच्छ व स्मार्ट कसे करता येईल. या संदर्भात तुमसर नगरपालिका नगरसेवकांचे शिष्टमंडळ इंदूर शहराची पाहणी करण्याकरिता दोन दिवसापूर्वी गेले. त्या शिष्टमंडळात नगरसेवक श्याम धुर्वे याचाही समावेश असल्याचे बोलके छायाचित्र व्हायरल झाले आहे. त्यामुळे या पुढे तुमसर पोलीस कोणती कारवाई करतात याकडे तुमसरकरांचे लक्ष लागून आहे.