शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर कोरोनाचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:01 IST

तालुक्यात उन्हाळी धान शेतीबरोबर भाजीपाल्याचेही पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. टोमॅटो, मिरची, कारली, वांगी, काकडी विविध पीके शेतकरी घेतात. भाजीपाल्याला चांगला भाव मिळेल यासाठी शेतकºयांनी उसनवार करीत भाजीपाला लागवड केली. मात्र यावर्षी शेतकºयांना अपेक्षित फायदा झाला नाही. पण यावर्षी भातशेती तोट्यात आल्याने भाजी पिकातून काही हाती येईल या आशेवर शेतकरी वर्गाने या वर्षी मोठा खर्च करून भाजीपाल्याची लागवड केली होती.

ठळक मुद्देलॉकडाऊनने आठवडी बाजार बंद । मजुरांअभावी भाजीपाला शेतातच पडून

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील जनतेला कोरोना संसर्गाच्या भीतीने घराबाहेर पडणे अशक्य झाले असल्याने शेतकरी वर्गसह मजूर वर्गावर आर्थिक संकट कोसळले आहे. गर्दीला आळा घालण्यासाठी घाऊक बाजारपेठा व तालुक्यातील आठवडी बाजार बंद केल्यामुळे पिकवलेला भाजीपाला विकायचा कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. लॉकडाउनने भाजीपाल्याचे भाव कमी झाल्याने आता पोल्ट्री व्यावसायिकांप्रमाणेच भाजीपाला फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.तालुक्यात उन्हाळी धान शेतीबरोबर भाजीपाल्याचेही पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. टोमॅटो, मिरची, कारली, वांगी, काकडी विविध पीके शेतकरी घेतात. भाजीपाल्याला चांगला भाव मिळेल यासाठी शेतकऱ्यांनी उसनवार करीत भाजीपाला लागवड केली. मात्र यावर्षी शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा झाला नाही. पण यावर्षी भातशेती तोट्यात आल्याने भाजी पिकातून काही हाती येईल या आशेवर शेतकरी वर्गाने या वर्षी मोठा खर्च करून भाजीपाल्याची लागवड केली होती. संचारबंदी सुरू असताना घराच्या बाहेर पडणे अशक्य झाल्याने शेतावर जाणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागात ७० टक्के शेतकऱ्यांना कोरोना बंदीचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. एकीकडे वीज पुरवठा रात्रीच्या वेळी सुरू आहे तर दुसरीकडे शेतीची कामे लांबणीवर जात असल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शेतातील उन्हाळी धान पिकाची निंदण करण्यासाठी जाणाऱ्या मजूर लोकांना आता पाच पेक्ष्या जास्त मजूर घेवून शेतावर जाता येत नाही. बी बियाणे, खते, औषधे व मजुरी महागली आहे. यावर्षी ढगाळ हवामानामुळे शेतीच्या खर्चात दुप्पटीने वाढ झाली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली असली तरी बाजारात मागणी नसल्याने रस्त्यावर भाजीपाला फेकण्याची वेळ आल्याचे अनेकांनी सांगितले. भाजीपाला पीकावर कोरोना व्हायसरचा प्रादुर्भाव झाल्याने परदेशात जाणारा माल बंद करण्यात आला आहे. टोमॅटोचे दरही कमी झाले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलत घाऊक बाजारपेठा व आठवडे बाजार बंद केल्याने आता हातात आलेल्या धान पिकांचे करायचे काय, हा प्रश्न त्याच्यासमोर आहे. त्यामुळे आता शेतकºयावर कोरोनाचा फटका बसला आहे.शेतकऱ्याना आर्थिक फटकाशहराजवळील शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी आणतात. मात्र जागतिक स्तरावर कोरोनाचा होणारा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने सार्वजनिक ठिकाणासह आठवडी बाजारावर बंदी आणली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या काढणीवर आलेला भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान होत आहे. भाजीपाला पीक कमी वेळात होणार असल्यामुळे तो वेळेवर काढून वेळेवर मार्केटमध्ये पोहोचण्याची धडपड शेतकºयांमध्ये असते. मात्र शहरातील आठवडी बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. एकतर संचारबंदीमुळे घराबाहेर पडणे बंद आहे. त्यामुळे रोजगार मिळेनासा झाला आहे. त्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.