शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

कोरोना रुग्णसंख्या नीचांकी पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 05:00 IST

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला होता. दरराेज सरासरी १२०० रुग्ण आढळून येत होते. मे महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांची संख्या घटू लागली. परंतु शंभरच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. गुरुवारी जिल्ह्यात ७५८ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा १९, साकोली ८, लाखनी १ आणि तुमसर व मोहाडी येथे प्रत्येक दोन असे ३२ रुग्ण आढळून आले. गत दोन महिन्यांत ही नीचांकी पातळी आहे.

ठळक मुद्देगुरुवारी ३२ पॉझिटिव्ह : पवनी आणि लाखांदुरमध्ये रुग्णसंख्या निरंक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाचा उद्रेक अनुभवलेल्या नागरिकांना गुरुवारी मोठा दिलासा मिळाला. गत दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्या नीचांकी पातळीवर आली. गुरुवारी केवळ ३२ पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या असून पवनी आणि लाखांदूरमध्ये तर एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला होता. दरराेज सरासरी १२०० रुग्ण आढळून येत होते. मे महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांची संख्या घटू लागली. परंतु शंभरच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. गुरुवारी जिल्ह्यात ७५८ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा १९, साकोली ८, लाखनी १ आणि तुमसर व मोहाडी येथे प्रत्येक दोन असे ३२ रुग्ण आढळून आले. गत दोन महिन्यांत ही नीचांकी पातळी आहे. गुरुवारी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४.२ पर्यंत खाली आला होता.गुरुवारी तुमसर तालुक्यातील एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर ७२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. सध्या जिल्ह्यात १०२० ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गत काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख ८० हजार ९६९ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५८ हजार ३७६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी ५६ हजार ३०९ व्यक्ती कोरोनामुक्त झाले, तर १०४७ व्यक्तींचा कोरोनाने बळी गेला. आता रुग्णसंख्या वेगाने कमी होत असून मृत्युसंख्याही नियंत्रणात आली आहे. त्यामुळे सर्वांना दिलासा मिळत आहे.

 

ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटू लागली

जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटू लागल्याचे दिसत आहे. एप्रिल महिन्यात १३ हजारापर्यंत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या गेली होती. मात्र आता रुग्ण संख्या कमी होवून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. जिल्ह्यात सध्या १०२० ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यात भंडारा ४०८, मोहाडी ६९, तुमसर ११५, पवनी ७७, लाखनी ८१, साकोली २०५, लाखांदूर ६५ रुग्णांचा समावेश आहे.

मृत्यूदर १.७९ टक्के - जिल्ह्याचा मृत्यूदर १.७९ टक्के असून सर्वाधिक मृत्यू भंडारा तालुक्यात नोंदविले गेले आहेत. भंडारा तालुक्यात ४८८, मोहाडी ९३, तुमसर ११८, पवनी १०४, लाखनी ९४, साकोली १०१, लाखांदूर ४९ अशा १०४७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. मृत्यूदर सुरूवातीपासून नियंत्रणात आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या