शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

वरठी होऊ पाहतोय ‘कोरोना हॉटस्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:01 IST

दिवसेंदिवस या कंपनीतील कामगार कोरोना बाधित असल्याचे प्रकरण समोर येत असल्याने गावात चिंता व्याप्त आहे. जिल्हा प्रशासनाने यावर तत्त्काळ प्रतिबंधित उपाय न केल्यास जिल्ह्यात सर्वाधिक भयावह परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोहाडी तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३२ वर आहे. यातील अर्धेअधिक कोरोना बाधित हे वरठी परिसरातील आहेत.

ठळक मुद्देदिवसेंदिवस वाढत आहेत रुग्ण : कंपनीतही कोरोनाचा शिरकाव, नागरिकांत भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : येथील एका कंपनीत कोरोनाने शिरकाव केला आहे. कंपनीत उत्पादित माल तपासणीकरिता आलेला अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाला. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या कामगारांनाही यापासून धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या कंपनीतील एंट्रीने वरठी परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरणार अशी भीती व्यक्त होत आहे.दिवसेंदिवस या कंपनीतील कामगार कोरोना बाधित असल्याचे प्रकरण समोर येत असल्याने गावात चिंता व्याप्त आहे. जिल्हा प्रशासनाने यावर तत्त्काळ प्रतिबंधित उपाय न केल्यास जिल्ह्यात सर्वाधिक भयावह परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोहाडी तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३२ वर आहे. यातील अर्धेअधिक कोरोना बाधित हे वरठी परिसरातील आहेत.उत्पादित सामान तपासणी करिता आलेला इसम कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. सदर अधिकारी हैद्राबाद येथे उपचार घेत आहे. तो अधिकारी वरठी येथील सॅनफ्लॅग कंपनीत जुलै महिन्यात चार दिवस मुक्कामी होता. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला येथून माघारी पाठवण्यात आल्याची चर्चा आहे. अधिकारी आजारी असल्याचे प्रकरण तापले आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या कामगारांना शोधणे सुरू आहे. वेळेवर प्रयत्न न करता कंपनीच्या व्यवस्थापनाने हलगर्जीपणा केल्याची चर्चाही गावात ऐकावयास आहे.या प्रकरणानंतर कंपनीत खासगी व्यवस्थेकडून कामगारांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यात ५६ कामगारांची काल तपासणी करण्यात आली. पण याबाबद कंपनी व्यवस्थापन कमालीची गुप्तता पाळत असल्याचे निदर्शनास आले आहे.कामगारांची कोरोना तपासणी परस्पर खासगी व्यवस्थेकडून करून याबाबदचा अहवाल अजून जाहीर करण्यात आला नाही. आज कंपनी कॉलोनीतील काही कामगारांना रूग्णवाहिकेने उपचारासाठी नेण्यात आले. तालुक्यात कोरोना बाधित निघणाºया यादीत सदर कंपनीशी संबधीत कामगारांची संख्या जास्त आहे. यामुळे गावात धास्तीचे वातावरण आहे.कोरोनाच्या शिरकावाने झपाट्याने वाढले रूग्णकोरोनाच्या वाढत्या संकटाला टाळण्यासाठी खबरदारी हाच एकमेव उपाय आहे. तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता दिशानिर्देश पाळले पाहिजे. सुरक्षित अंतर, तोंडाला मास्क यासह अकारण बाहेर पाळणे टाळावे असे आव्हान तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास मेश्राम यांनी केले आहे. कामानिमित्त बाहेर जाणाऱ्यांनी आवश्यक खबरदारी व सुरक्षा साधने आवर्जून बाळगावी असे सांगितले.नागरिकांचा जीव टांगणीवरवरठी परिसरात कोरोना झालेला शिरकाव हे त्या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे झाले आहे. आवश्यक ती खबरदारी न घेता कामगाराच्या जीवाशी खेळ खेळत आहे. वरठी व परिसरातील नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. या प्रकरणाचा तपास करून हयगय करून माहिती दडवणारे कंपनीचे वैदकीय अधिकारी व व्यवस्थापन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शरदचंद्र वासनिक यांनी केली आहे. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या