शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

कोरोनाने जीडीपीवर विपरीत परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:00 IST

विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याचा विकासात्मक कार्यावर परिणाम जाणवेल, असा अंदाज राष्टÑवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला. येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत औपचारीक बैठकींनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देप्रफुल पटेल : भंडारा येथे पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना ही वैश्विक महामारी आहे. या महामारीचा सर्वांनाच फटका बसला आहे. केंद्राच्या वित्त समितीच्या बैठकीतही सकल देशातंर्गत उत्पादनावर (जीडीपी)विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याचा विकासात्मक कार्यावर परिणाम जाणवेल, असा अंदाज राष्टÑवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला. येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत औपचारीक बैठकींनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.खा. पटेल म्हणाले, भंडारातील शटल रेल्वेचा हा ज्वलंत प्रश्न आहे.रेल्वेचे रूळ काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शहरवासीयांसाठी शटल रेल्वे होणे ही बाब स्वप्नपूर्ती होती. मात्र या अपेक्षांवर पाणी फेरण्यात आले आहे. ही गंभीर बाब आहे. परिणामी रेल्वेसाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असे संकेतही त्यांनी दिले. तसेच याबाबत मित्रपक्षांनी आंदोलन उभारले तर आमचा त्याला सक्षम पाठिंबा राहील, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. केंद्राने घोषित केलेल्या राष्ट्रीय शिक्षण पद्धतीवर केंद्राचा धोरणात्मक निर्णय योग्य असून त्यात काळानुरूप बदल होणे अपेक्षित होते. त्यावर आक्षेप घेण्यासारखे काही नाही. आणखी त्यात चांगले बदल घडवून आणायचे असेल तर सूचना केल्यास योग्य ठरेल.धानाचा बोनस लवकरच देण्यात येणार असून हुंडी पाठवायला उशीर झाल्याने उरलेला निधी द्यायला विलंब झाल्याचेही खा.पटेल यांनी सांगितले.कोरोना संकटकाळात हॉटेल्स, विमान, रेल्वे सेवा, पर्यटन या सर्वांवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम जाणवला आहे. याचा सरळ-सरळ फटका यावर आधारीत असंख्य कुटुंबाना बसला आहे. या संकटातून सर्वांच्या सहकार्यातून मार्ग काढायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. यासह संकटग्रस्तांना केंद्र सरकारने मदतीचा तातडीने हात देण्याची आज नितांत गरज असल्याचे याप्रसंगी खा.पटेल यांनी सांगितले. पत्रपरिषदेला माजी खासदार मधुकर कुकडे, आमदार नरेंद्र भोंडेकर, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या