शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

तंटामुक्तीसाठी समन्वय महत्त्वाचा

By admin | Updated: May 20, 2014 23:26 IST

गावे तंटामुक्त झाली म्हणून मोहीम संपली असे नाही. यापुढेही मोहीम राबविण्याचे काम सुरूच राहणार असल्याने तंटामुक्त गाव समित्यांनी गावातले तंटे गावात मिटवीत राहावे.

भंडारा : गावे तंटामुक्त झाली म्हणून मोहीम संपली असे नाही. यापुढेही मोहीम राबविण्याचे काम सुरूच राहणार असल्याने तंटामुक्त गाव समित्यांनी गावातले तंटे गावात मिटवीत राहावे. आवश्यक तेथे प्रशासनाची मदत घ्यावी. महसूल आणि पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी गावभेटी दौर्‍याचे वेळी तंटामुक्त गाव समित्यांना पुरेपुर मार्गदर्शन करून तंटे मिळविण्यात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक कैलास कणसे यांनी केले आहे. मालमत्ता आणि शरीर संबंधातील गुन्हेगारीवर आळा बसेल यादृष्टीने ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांनी चोखपणे कार्य करीत राहावे. गावपातळी वरील समितीमध्ये सर्व प्रकारचे सदस्यांचा समावेश असल्याने सर्वांनी व्यवस्थित कर्तव्य बजावल्यास मोहिमेला निश्चितच गती येऊ शकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गावपातळीवर छोट्याछोट्या कारणावरून निर्माण होणार्‍या तंट्यांचे पर्यावसन मोठ्या तंट्यात होवू नये, वादामध्ये मालमत्ता अडकून पडून त्यातून आर्थिक नुकसान होवू नये कुटुंबाची समाजाची व गावाची शांतता धोक्यात येऊ नये, यादृष्टीने गावात तंटे निर्माण होणार नाहीत व अस्तित्वात असलेले तंटे लोकसहभागातून समारोपचारोन आणि आवश्यक तेथे प्रशासनाची मदत घेऊन सोडविण्याचे व्यवस्था निर्माण व्हावी याकरिता महाराष्ट्र शासनाने १५ आॅगस्ट २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली आहे. भंडारा जिल्ह्यात अंर्तभूत होणार ७ तालुके १५ पोलीस स्टेशन व त्यामधील ५४२ ग्रामपंचायती असून सर्वच ग्रामपंचायतीनी मोहिमेत सहभाग घेतला होता. गावपातळीवर पोलीस ठाणे पातळीवर, तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर समित्यांची स्थापना करून गावपातळीवर समितीमध्ये समाजात ज्याचा प्रभाव आहे अशा प्रतिष्ठीत, प्रामाणिक, समजुतदार आणि निस्वार्थी व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. तंटामुक्त गाव समितीमध्ये पोलीस पाटील ग्रामसेवक तलाठी व पोलीस बिट अंमलदार यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. भंडारा जिल्ह्यातील तंटामुक्त गाव समित्यानी मोहिम सुरू झाल्यापासून उत्कृष्ट कामगिरी केल्याने जिल्ह्यातील ५४२ ग्रामपंचायती तंटामुक्त होवून भंडारा जिल्हा तंटामुक्त जिल्हा झाला आहे. जिल्ह्यात १२ कोटी १७ लक्ष ५० हजार रूपयेचे बक्षीस मिळालेले आहे. अजुनही २२ ग्रामपंचायतींना शासनाकडून पुरस्काराची रक्कम मिळावयास आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)