शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

रेतीमाफियांच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

तालुक्यात चुलबंद नदी, पिपरीघाट, शशीकरण नदी, कोदामेडी, सौंदड या भागातून अवैधरित्या रेती उपसा करुन शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जात आहे. रेतीमाफीया महसूल व पोलीस विभागाला न जुमानता अवैधरित्या रेती चोरुन थोड्याच दिवसात श्रीमंत झाले. श्रीमंतीमुळे ते मुजोर होवून दिवसा व रात्री बिनधास्तपणे रेती चोरुन नेत असल्याने शासकीय यंत्रणा त्रस्त झाली होती.

ठळक मुद्देडुग्गीपार पोलिसांची कारवाई : ३ रेतीमाफीया व २ दारू विक्रेत्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू असून रेती माफिया महसूल व पोलीस विभागाला न जुमानता गब्बर झाले आहेत. त्यातच अवैध दारू विक्रेत्यांचेही मनसुबे बळावले आहेत. डुग्गीपार पोलिसांनी अवैध रेतीमाफीयांच्या मुसक्या आवळल्या असून ३ रेतीमाफीया व २ दारूविक्रेत्यांना तडीपार करण्यासाठी कारवाईचा प्रस्ताव पाठविला आहे.तालुक्यात चुलबंद नदी, पिपरीघाट, शशीकरण नदी, कोदामेडी, सौंदड या भागातून अवैधरित्या रेती उपसा करुन शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जात आहे. रेतीमाफीया महसूल व पोलीस विभागाला न जुमानता अवैधरित्या रेती चोरुन थोड्याच दिवसात श्रीमंत झाले. श्रीमंतीमुळे ते मुजोर होवून दिवसा व रात्री बिनधास्तपणे रेती चोरुन नेत असल्याने शासकीय यंत्रणा त्रस्त झाली होती. रेतीमाफीयांचे एकमेकांशी कनेक्शन पाहता पोलीस किंवा महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्यावर वॉच ठेवून त्वरीत एकमेकांना माहिती पुरवून ते गायब होत होते. त्यामुळे लोकांचा महसूल विभाग व पोलीस विभागावरचा विश्वास डळमळीत झालेला होता.डुग्गीपारचे ठाणेदार विजय पवार यांनी मात्र सर्व रेतीमाफीयांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कुंडली काढून त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती घेत वर्गीकरण केले. त्यानुसार चालू वर्षात वाळूचोरीचे २३ गुन्हे दाखल झाल्यावर रेती चोरांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु केले. सुरुवातीला २ पेक्षा जास्त रेती चोरीच्या गुन्हेगारांविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ११० प्रमाणे प्रतिबंधक कारवाया केल्या.सदर कारवाई होऊनही ज्या रेतीमाफीयांनी आपला अवैध धंदा सुरुच ठेवला अशा ३ रेतीमाफीयांवर शासनाच्या मालमत्तेचे रक्षण व्हावे व सार्वजनिक शांतता कायम राहावी म्हणून तडीपारीचे प्रस्ताव पोलीस अधीक्षकांमार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठविले आहे. त्यामुळे रेतीमाफीयांचे धाबे दणाणले असून ते धास्तावलेले आहेत.तसेच अवैधरित्या देशी व विदेशी दारु विक्री करणाºयांमुळे सामाजिक वातावरण दूषित होवून सार्वजनिक शांतता भंग होत आहे. यामुळे जनसामान्यांना विनाकारण त्रास सोसावा लागत असल्यामुळे त्यांच्यावरही कठोर प्रतिबंध व्हावा म्हणून २ अवैधरित्या दारु विकणाºया इसमांविरुद्ध सुद्धा तडीपारचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या या ५ तडिपार कारवाईमुळे वाळूमाफीया व अवैधरित्या दारु विक्रेत्यांचा प्रतिबंध होईल. मात्र पोलिसांनी या कारवाईत सातत्याने ठेवण्याची गरज असल्याचे नागरिक बोलत आहे. 

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया