शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सनफ्लॅग कामगारांचा कराराचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:47 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीने सनफ्लॅग आर्यन अँड स्टील कंपनी भंडारा रोड आणि कामगार संघटना यांच्यातील वेतन वृद्धी व बोनसबाबद पुढील तीन वर्षांसाठी आज करार करण्यात आला.

ठळक मुद्देनितीन गडकरी यांची मध्यस्थी : कारखाना व्यवस्थापन व कामगार संघटनेत झाली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीने सनफ्लॅग आर्यन अँड स्टील कंपनी भंडारा रोड आणि कामगार संघटना यांच्यातील वेतन वृद्धी व बोनसबाबद पुढील तीन वर्षांसाठी आज करार करण्यात आला. आठ दिवसांपासून कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात सुरु असलेल्या वाटाघाटीला अंतिम मंजुरी नागपूर येथे झालेल्या बैठकीत देण्यात आली. दिवाळीच्या मोक्यावर सुरु असलेले बोनस व वेतन वृद्धी बाबद तिढा सुटल्यामुळे कामगारांत आनंदाचे वातावरण आहे.सनफ्लॅग आर्यन अँड स्टील कंपनीत सध्यस्थित ५७८ स्थायी कामगार आहेत. कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापन यांच्यात वेतन वृद्धी व बोनस करीता तीन वर्षांपूर्वी झालेला करार ३१ मार्च रोजी संपुष्ठात आला होता . नियमानुसार करार संपुष्ठात येण्यापूर्वी संघटना आणि व्यवस्थापन यांनी कराराच्या अटी बाबद कारवाही करणे आवश्यक आहे. याबाबद संघटनेने सनफ्लॅग व्यवस्थापनाला अनेकदा सूचना केल्या. पण याबाबद कंपनी व्यवस्थापनाचे अडेलतट्टू धोरणामुळे बैठकी फिस्कटल्या होत्या. कामगार संघटना यांनी वेतन वृद्धी व बोनस करीता तात्काळ निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापनाला अनेकदा सूचना केल्या पण त्याकडे हेतुपरस्पर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनांनी केला होता. करारासाठी पूर्वरत प्रचलित पद्धत किंवा कंपनीच्या नफ्यानुसार पगार वाढ कारण्याची मागणी सनफ्लॅग व्यवस्थापन यांचेकडे केली आहे. गत वर्षात सनफ्लॅग कंपनीला ६५ करोड सुद्धा नफा झाला होता. सनफ्लॅग कंपनीला हा नफा कंपनीवर असलेला कर्ज फेडून झाला असल्यामुळे कंपनीची आर्थिक बाजू भक्कम आहे. सन २०१४ रे २०१७ या काळात सनफ्लॅग कंपनीला १४१ करोड रुपयाचा नफा झाला. त्यातुलनेत वेतनवृद्धी व बोनस कामगारांना मिळावा अशी मागणी संघटनांनी केली होती.बुधवारला नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सनफ्लॅग व्यवस्थापन व कामगार संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक घेतली. यात पुढील तीन वर्षांकरिता ७,२०० रुपये वेतनवृद्धी व बोनस करारानुसार पहिल्या वर्षाकरिता २८ हजार ५०० रुपये दुसºया वर्षाकरिता २९ हजार ५०० व तिसºया वर्षाकरिता ३० हजार ५०० याप्रमाणे मंजूर करण्यात आले होते. यापूर्वी तीन वर्षांपूर्वी ६ हजार ६५० रुपये वेतन वृद्धी व २६ हजार रुपये बोनस जाहीर झाले होते. यावेळी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष विजय बांडेबुचे , महासचिव मिलिंद वासनिक किशोर मारवाडे , विजेंद्र नेमा , विकास फुके, अमोद डाकरे, विकास बांते , रवींद्र बोरकर, ज्ञानेश्वर वंजारी, शिवकुमार सार्वे , शैलेंद्र दुबे, सारंग व्यवहारे, प्रदीप नागपुरे, जावेद , डी एन यादव, संदेश गणवीर, प्रकाश बलभद्रे व महेश बर्वेकर उपस्थित होते.