शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात पावसाची संततधार; बोदरा तलाव फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 10:40 IST

 गुरुवार दुपारपासून जोरदार पावसाला प्रारंभ झाला. रात्री उशीरापर्यंत पाऊस बरसत होता. शुक्रवारी पहाटे विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सकाळी ९ वाजतापासून सुरवात झाली.

ठळक मुद्दे सखल भागातील घरात पाणी शिरले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  गुरुवार दुपारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने हाहाकार उडाला आहे. नदीनाल्यांना पूर आला असून अनेक रस्ते बंद झाले. सखल भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरुन पडझड झाली. बोदरा येथील तलाव फुटला असून कोणतीही जिवित हानी झाली नाही. गुरुवार दुपारपासून जोरदार पावसाला प्रारंभ झाला. रात्री उशीरापर्यंत पाऊस बरसत होता. शुक्रवारी पहाटे विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सकाळी ९ वाजतापासून सुरवात झाली. या पावसाने तुमसर ते येरली रस्त्यावरील नाल्याला पूर आल्याने पुलावरून तीन फुट पाणी वाहत आहे. त्यामुळे बंद झाला आहे. साकोली येथील एकोडी रोड परिसरातील अनेक घरामध्ये नवतलावाचे पाणी शिरले आहे. साकोली-तुमसर रस्ता चांदोरी गावाजवळ नाल्याला पूर आल्याने बंद आहे. तसेच साकोली-परसोडी, साकोली-विरसी-सातलवाडा ,साकोली-जमनापुर हे मार्गही बंद आहेत. बोदरा गावातील तलाव फुटला असून जीवीत हानी झालेली नाही. लाखनी तालुक्यातील मुरमाडी गावातील शिवनगर वॉर्डात पाणी वाढत असून काही घरात पाणी शिरले आहें.

रेंगेपार कोठा गावातील तलाव ओव्हर फ्लो होऊन गावात पाणी शिरत आहे.मोहाडी आणि तुमसर तालुक्यातील अनेक घरांत पुराचे पाणी शिरले आहे. लाखनी तालुक्याच्या मऱ्हेगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने मार्ग बंद आहे. भंडारा शहरातील अनेक भागातील घरांत पाणी शिरले असून घरांची पडझड झाली आहे. 

टॅग्स :Rainपाऊस