शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 05:00 IST

दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. प्रत्येक जण दिवाळीला आपल्या ऐपतीपेक्षा थोडे जास्तच खरेदी करतो. गत दीड वर्षांपासून कोरोना संकटामुळे सर्वत्र निराशा दिसत होती. मात्र आता ही निराशा झटकून सर्वच जण दिवाळीच्या खरेदीच्या कामाला लागले असल्याचे चित्र आहे. भंडारा शहरातील बाजारपेठ अशा गर्दीने फुलली आहे. संपूर्ण परिवार खरेदीसाठी सकाळपासूनच बाहेर निघत असल्याचे चित्र आहे. बडा बाजार, मेन लाइन या परिसरात तर गत दोन दिवसांपासून पाय ठेवायलाही जागा नाही. सर्वाधिक गर्दी दिसती ते कापड दुकानांमध्ये.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संकटाचे काळे ढग दूर होताच सर्वांमध्ये उत्साह संचारला आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने खरेदीसाठी प्रत्येक जण घराबाहेर पडत आहे. त्यामुळे भंडारा शहरातील बाजारपेठेत तुफान गर्दी झाली आहे. सर्वाधिक गर्दी कापड दुकानात दिसत असून दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध साहित्यांनी दुकाने सजली आहेत. दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. प्रत्येक जण दिवाळीला आपल्या ऐपतीपेक्षा थोडे जास्तच खरेदी करतो. गत दीड वर्षांपासून कोरोना संकटामुळे सर्वत्र निराशा दिसत होती. मात्र आता ही निराशा झटकून सर्वच जण दिवाळीच्या खरेदीच्या कामाला लागले असल्याचे चित्र आहे. भंडारा शहरातील बाजारपेठ अशा गर्दीने फुलली आहे. संपूर्ण परिवार खरेदीसाठी सकाळपासूनच बाहेर निघत असल्याचे चित्र आहे. बडा बाजार, मेन लाइन या परिसरात तर गत दोन दिवसांपासून पाय ठेवायलाही जागा नाही. सर्वाधिक गर्दी दिसती ते कापड दुकानांमध्ये. लहान मुलांसह महिला कपडे खरेदीत व्यस्त असल्याचे चित्र प्रत्येक दुकानात दिसत आहे. दीड वर्ष ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेल्या दुकानदारांच्या चेहऱ्यावरही या दिवाळीने नवचैतन्य आणले आहे.दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकही भंडारा शहरात दाखल होत आहेत. मात्र सर्वच वस्तूंचे वाढलेले दर पाहून अनेकांचे डोळे पांढरे होण्याचीही वेळ आली आहे. गतवर्षीपेक्षा सर्वच वस्तू २० ते ३० टक्क्यांनी महागल्याचे दिसत आहे. परंतु दिवाळीच्या आनंदापुढे आणि त्यातही कोरोना संकट नसल्याने खरेदी जोरात सुरू आहे. 

आकाश कंदील आणि पणत्यांना मागणीप्रकाशाचा सण असलेल्या दिवाळीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आकाश कंदील आणि रस्त्यावर पणत्या विक्रीसाठी आले आहेत. विविध आकाराच्या पणत्यांना आणि आकाश कंदिलांना मागणी आहे. दरवाढ असली तरी दिवाळीपुढे ही दरवाढ नगण्य असल्याने खरेदी केली जात आहे.

बाजारात कर्मचारी, शेतकरी बेपत्तादिवाळीच्या खरेदीसाठी बाजारातील गर्दीत सर्वाधिक कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय दिसत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना बोनस आणि वेतन मिळाले आहे. त्यामुळे कुटुंबासह मनसोक्त खरेदीचा आनंद लुटत आहे. परंतु या गर्दीत शेतकरी आणि शेतमजूर कुठेही दिसत नाही. अद्याप धान खरेदी सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात पुरेसा पैसा आला नाही. काही शेतकरी व्यापाऱ्यांना धान विकून दिवाळीसाठी तजवीज करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रविवारनंतर शेतकरी आणि शेतमजुरांची बाजारपेठेत गर्दी दिसणार आहे.

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021Marketबाजार