शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

परवाना असेल तरच घ्या दारू; नाही तर विक्रेत्याला 25 हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2022 00:02 IST

उत्पादन शुल्क विभागाची मद्यविक्री करण्यासाठीची नियमावली ही कठोर आहे. मात्र, मद्यविक्रेते या नियमावलीचे पालन करत नाहीत, हे वास्तव आहे. कोणीही यावे आणि दारू घेऊन जावे, असा प्रकार सुरू आहे.  परवाना असलेल्या व्यक्तीलाच दारू देणे बंधनकारक आहे. अन्यथा अशा विक्रेत्याला किंवा बारचालकाला २५ ते ३० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो; परंतु, परवाना नसतानाही दारू पिणाऱ्यांना सर्रास दारूची विक्री केली जाते.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार दुकानातून मद्य खरेदी करताना मद्यसेवन परवाना आवश्यक आहे. मात्र, शहर व ग्रामीण अशा दोन्ही भागात मद्यविक्रेत्यांकडून नियमावली गुंडाळून दारूची विक्री केली जात आहे. उत्पादन शुल्क विभागाची मद्यविक्री करण्यासाठीची नियमावली ही कठोर आहे. मात्र, मद्यविक्रेते या नियमावलीचे पालन करत नाहीत, हे वास्तव आहे. कोणीही यावे आणि दारू घेऊन जावे, असा प्रकार सुरू आहे.  परवाना असलेल्या व्यक्तीलाच दारू देणे बंधनकारक आहे. अन्यथा अशा विक्रेत्याला किंवा बारचालकाला २५ ते ३० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो; परंतु, परवाना नसतानाही दारू पिणाऱ्यांना सर्रास दारूची विक्री केली जाते.

दिवसाचा परवाना पाच, तर वर्षाचा १०० रुपयांत दारू पिण्यासाठी व विकत घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याचा परवान्याची गरज असते. यासाठीची वयोमर्यादा ही २१ वर्षे आहे. हा परवाना एक दिवस, एक वर्ष किंवा आजीवनही  मिळू शकतो. दिवसाचा परवाना पाच, १०० रुपयांत वर्षभर आणि एक हजारात आजीवन परवाना दिला जातो. 

परवाना कोठे मिळतो?मद्यसेवन करण्याचा परवाना ऑनलाइन देण्याची सुविधा आहे. त्याकरिता आधारकार्ड आवश्यक आहे. एक वर्ष किंवा आजीवन परवाना मिळविण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग कार्यालयात अर्ज करावा लागतो.

अशी कारवाई झालीच नाही मद्य परवाना नसल्यास मद्य पिताना आढळल्यावर आणि त्याला विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर व बार चालकावर अशी कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोंदियात केल्याचे ऐकीवात नाही.

मद्यविक्री आणि पिणाऱ्यांच्या परवान्यांचा  ताळमेळ जुळेल का?- दारू परवान्याचे शुल्कही एक्साइजकडे भरले जाते. दुकानात एक्साइज निरीक्षक तपासणीला आले की, मद्यविक्री आणि सेवन करण्याच्या परवान्यांचा ताळमेळ जुळवला जातो. मद्यविक्री आणि पिणाऱ्यांच्या परवान्यांचा ताळमेळ जुळेल का, असा सवाल केला जात आहे.

काय आहे कायदा?परवाना नसताना मद्य बाळगणे तसेच परवाना नसलेल्यांना मद्यविक्री करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे मद्यविक्रेत्यांनी यासंदर्भात योग्य ती खबरदारी घ्यावी, असे कायदा सांगतो.

नियम असला तरी विचारतो कोण? ग्राहकाकडे परवाना आहे की नाही, हे पाहण्याची आणि त्यासाठी योग्य ती सोय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विक्रेत्यांवर टाकलेली आहे. या नियमांचे कोणीही मद्यविक्रेता पालन करत नाही. एकाही मद्य विक्री दुकानात मद्य सेवन परवाना विचारला जात नाही. मात्र, मद्य विक्रेत्यांकडे मद्य सेवन परवाना रेकॉर्ड नीट ठेवले जाते. 

 

टॅग्स :liquor banदारूबंदी