शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देव्हाडीत उड्डाणपूलाचे बांधकाम कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 22:40 IST

मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे क्रॉसिंग वरील देव्हाडी उड्डाणपुलाचे काम संथपणे सुरू आहे. निधीची कमतरता हे प्रमुख कारण आहे.

ठळक मुद्देनिधीची कमतरता : उड्डाणपूल ठरला डोकेदुखी, १२६ लाखांपैकी केवळ ४६ लाखांचा निधी प्राप्त

आॅनलाईन लोकमततुमसर : मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे क्रॉसिंग वरील देव्हाडी उड्डाणपुलाचे काम संथपणे सुरू आहे. निधीची कमतरता हे प्रमुख कारण आहे. १ कोटी २६ लाखांचे कामे पूर्ण केल्यावर केवळ ४६ लक्ष येथे देण्यात आले. तुमसर-गोंदिया मार्गावरील उड्डाणपुल बांधकाम डोकेदुखी ठरत आहे. पर्यायी रस्त्यावर खड्यामुळे आजार बळावला आहे.देव्हाडी येथे तुमसर-गोंदिया राज्य मार्गावर देव्हाडी रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ वर दोन वर्षापुर्वी प्रत्यक्ष उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात झाली. राज्य शासन तथा रेल्वे मंत्रालय यांचा हा संयुक्त उड्डाणपूल आहे. राज्य शासन २४ कोटी तर रेल्वे १४ कोटी रूपये खर्च करणार आहे. सुमारे ४० कोटींचा हा उड्डाणपूल आहे. सध्या येथील कामे संथगतीने सुरू आहेत. १ कोटी २६ लाखांचे कामे केल्यानंतर केवळ ४७ कोटी रूपये येथे देण्यात आले. केंद्र सरकार येथे निधी उपलब्ध करून देतो.रेल्वेने १० दिवसापूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली आहे. राज्य सरकार दोन्ही बाजूला अ‍ॅप्रोचचे बांधकाम करीत आहे. त्यात भराव भरून बांधकाम अशी कामे आहेत. उड्डाणपूलाचा पर्यायी मार्ग येथे तयार करण्यात आले. त्यावर खड्डे पडले आहेत. धूलीकरणामुळे ग्रामस्थ तथा प्रवाशी त्रस्त झाले असून आजार बळावला आहे. मोठ्या प्रमाणात येथे वाहतूक सुरू राहते. त्यामुळेच येथे उड्डाणपूल मंजूर करण्यात आला.खड्ड्यात गिट्टीचे पॅचेस घालून डामरीकरण करण्याची येथे नितांत गरज आहे. वृद्ध व लहान मुलांना दम्याचा आजार येथे बळावण्याची शक्यता आहे. केंद्र व राज्य शासनाने येथे तात्काळ निधी उपलब्ध करून उड्डाणपूल पूर्णत्वाकरीता प्रयत्न करण्याची गरज आहे. रहदारी जास्त असल्याने पर्यायी व्यवस्था येथे कुचकामी ठरत आहे. प्रशासनाने येथे लक्ष देण्याची गरज आहे.देव्हाडी उड्डाणपुलाचे कामे सध्या सुरू असून ३ कोटी ८२ लाखांचे देयके कंत्राटदाराने सादर केले आहेत. ४७ लाखांचे देयके त्यांना मिळाली आहेत. उपलब्ध निधीनुसार त्यांना देयके मिळत आहेत.-बी.आर. पिपरेवार,कनिष्ठ अभियंता, उड्डाणपूलबांधकाम विभाग, नागपूर.देव्हाडी उड्डाणपूलाकरिता केंद्र शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून उड्डाणपुल लवकर पूर्ण करावे. रहदारीचा रस्ता असल्याने प्रत्येकाला येथे मोठा त्रास होतो. रेल्वे फाटक बंदमुळे वाहनांच्या रांगा येथे राहतात. अपघाताची येथे शक्यता अधिक आहे. विकासात्मक कामाला निधी द्यावा.- के.के. पंचबुद्धे,जिल्हा परिषद सदस्य देव्हाडी.